Air India pilot Invites Female Friend in cockpit;पायलटने मैत्रिणिला कॉकपीटमध्ये बोलावलं, आता आयुष्यभराचा झालाय पश्चाताप

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Air India Pilots: एअर इंडियाच्या दोन वैमानिकांनी आपल्या मैत्रिणिला विमानाच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाची एअर इंडिया प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. निष्काळजीपणा आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या एका चुकीमुळे त्यांना एअर इंडियाची नोकरी गमवावी लागली आहे. 

गेल्या आठवड्यात एका महिलेला दिल्ली-लेह फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याबद्दल एअरलाइनने दोन वैमानिकांवर कारवाई सुरू करण्यात आहे. AI-445 विमानाच्या कॉकपिटमध्ये अनधिकृतपणे महिला प्रवाशाच्या प्रवेशाबाबत केबिन क्रूकडून तक्रार करण्यात आली. यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने पायलट आणि सह-वैमानिकावर कारवाई केली. 

महिनाभरापूर्वीही असाच एक प्रकार घडला होता, जिथे एअर इंडियाच्या पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले होते, त्यानंतर तिला ड्युटीवरून काढून टाकण्यात आले होते.

‘AI-445 पायलटच्या एका महिला मैत्रिणीने नियमांचे पालन न करता कॉकपिटमध्ये प्रवेश केला. यानंतर दोन्ही वैमानिकांना एअर इंडियाने ग्राउंड/ऑफ-रोस्टर केल्याची माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.नागरी विमान वाहतूक नियामक संचालनालय (डीजीसीए) दिलेल्या माहितीनुसार, ‘डीजीसीएला या समस्येची जाणीव आहे आणि या प्रकरणातील प्रक्रियेनुसार आवश्यक कारवाई केली जात आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने सविस्तर चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. मात्र याप्रकरणी एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. लेह मार्ग हा सुरक्षेच्या दृष्टीने देशातील सर्वात कठीण आणि संवेदनशील हवाई मार्गांपैकी एक आहे आणि व्यावसायिक विमानाच्या कॉकपिटमध्ये अनधिकृत व्यक्तीला प्रवेश देणे कायद्याचे उल्लंघन आहे. 

अधिक उंचीवर असलेल्या पर्वतीय प्रदेशामुळे लेह विमानतळावर उतरणे हे देशभरातील सर्वात कठीण ऑपरेशन्सपैकी एक आहे. देशाच्या संरक्षण दलांचे तळ असल्याने ते संवेदनशील देखील आहे. लेह ऑपरेशनसाठी खूप चांगले आरोग्य आवश्यक आहे. तेथील कमी ऑक्सिजनची पातळी पाहता केवळ उत्तम आरोग्य असलेले अत्यंत कुशल वैमानिकच लेह ऑपरेशन्ससाठी तैनात केले जावेत, असे एव्हिएशन तज्ज्ञ विपुल सक्सेना यांनी सांगितले. 

Related posts