मेहुणीला वश करण्यासाठी पती अर्ध्या रात्री करत होता काळी जादू, संतापलेल्या पत्नीने अखेर….

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका अजब प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीवर मेहुणीला मिळवण्यासाठी रात्री 12 वाजता तंत्र-मंत्र करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर रात्री 2 वाजता काळी जादू केल्यानंतर पत्नीला मारहाण करत असल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मेहुणीचं लग्न त्याच्याच छोट्या भावाशी झालं आहे. अखेर कंटाळलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्तांकडे तिने न्याय देण्याची विनंती केली. यानंतर पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे सोपवलं आहे. 

तक्रारदार महिलेचं लग्न जगदीशपुरा येथे राहणाऱ्या तरुणाशी झालं होतं. 2013 मध्ये हिंदू पद्धतीने दोघांचं लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. एक मुलगा 7 वर्षं आणि दुसरा 9 वर्षांचा आहे. लग्नानंतर 4 वर्षं संसार व्यवस्थित सुरु होता. पण 2017 नंतर अचानक पतीने तंत्रविद्येचा आधार घेण्यास सुरुवात केली. यामुळे पती-पत्नींमध्ये रोज भांडण होऊ लागलं होतं. 

पत्नीने आरोप केला आहे की, आपल्या बहिणीला मिळवण्यासाठी पती तंत्र-मंत्राचा आधार घेत आहे. मी विरोध केल्यानंतरही तो मला सतत मारहाण करतो. पतीवर आरोप आहे की, 2020 मध्ये पतीने मारहाण करत तिला घराबाहेर काढून टाकलं होतं. 

महिलेने कुटुंब समुपदेशन केंद्रात सांगितलं की, 2020 मध्ये पतीने मला माहेरी पाठवल्यानंतर मी सासरीही ये-जा करत होती. पतीच्या वागण्यात कोणताही बदल होत नसल्याने मी सासरी थांबली नाही. 

तसंच तिने सांगितलं की, पती रात्री 12 वाजल्यानंतर अघोरी प्रकार सुरु करतो आणि त्यानंतर अचानक मारहाण करण्यास सुरुवात करतो. महिलेने सांगितलं की, आपल्याला दोन बहिणीही आहेत. छोट्या बहिणीचं लग्न पतीच्या भावाशी झालं आहे. 

महिलेचा आरोप आहे की, पतीची आपल्या छोट्या बहिणीवर वाईट नजर आहे. पतीने मारहाण केल्यानंतर मला घराबाहेर काढलं आणि छोट्या बहिणीशी संबंध ठेवली. पतीने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

Related posts