testicular cancer symptoms signs causes treatment at home; टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजे काय त्याची लक्षणे कारणे व उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

टेस्टिक्युलर कॅन्सरची लक्षणे

टेस्टिक्युलर कॅन्सरची लक्षणे

आता जाणून घेऊया की टेस्टिक्युलर कॅन्सरची अशी कोणती लक्षणे आहेत जी दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे.

  1. एक किंवा दोन्ही अंडकोषांमध्ये गाठ किंवा सूज येणे
  2. अंडकोषात जडपणा जाणवणे
  3. खालच्या ओटीपोटात किंवा अंडकोषांच्या भागात वेदना होणे
  4. अंडकोषांत जलद सूज निर्माण होणे
  5. अंडकोषात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे
  6. छातीचे टिश्यू कमजोर होणे आणि पाठदुखी सतावणे

ही सगळी टेस्टिक्युलर कॅन्सरची लक्षणे आहेत.
(वाचा :- हेल्दी व दीर्घायुष्यासाठी अभिनेत्री राधिका मदान झाली 100% Vegetarian, अंड चिकन नाही या पदार्थांनी केलं वेटलॉस)​

जर्म सेल टेस्टिक्युलर कॅन्सरचे प्रकार

जर्म सेल टेस्टिक्युलर कॅन्सरचे प्रकार

शरीरात शुक्राणू तयार करणाऱ्या पेशींमध्ये होणाऱ्या कॅन्सरला जर्म सेल टेस्टिक्युल कॅन्सर म्हणतात आणि त्याचे काही प्रकार असतात.

  1. सेमिनोमज
  2. नॉनसेमिनोमास (टेराटोमास, भ्रूण कार्सिनोमास, कोरिओकार्सिनोमास, योल्क सॅक ट्यूमर)
  3. लिडीग सेल ट्यूमर
  4. सेर्टोली सेल ट्यूमर

हे या कॅन्सरचे काही प्रकार आहेत.
(वाचा :- भारतात 7 भयंकर आजार व संसर्ग पसरवणार Cyclone Biparjoy? फेल होऊ शकतात लिव्हर व किडनी, बचावासाठी हा एकच पर्याय.!)​

टेस्टिक्युलर कॅन्सरची कारणे

टेस्टिक्युलर कॅन्सरची कारणे

डॉ. गगन यांच्या मते, टेस्टिक्युलर कॅन्सरचे नेमके कारण माहित नाही. परंतु कुटुंबात याचा इतिहास असल्यास धोका वाढतो. याशिवाय, गर्भात असताना जर बाळाचे टेस्टिकल स्क्रोटममध्ये पूर्ण आत गेले नाही तरि सुद्धा या कर्करोगाचा धोका देखील वाढतो. याला क्रिप्टोरकिडिझम किंवा अनडिसेंडेड टेस्टिकल असेही म्हणतात.
(वाचा :- साध्या पाण्यात या 10 गोष्टी मिक्स केल्याने पोषक तत्व होतात डबल, हे पाणी आतडी करतं आतून बाहेरून साफ आणि हेल्दी)​

5 मिनिटांत करा टेस्ट

5-
  1. गरम पाण्याने आंघोळ करताना पाच मिनिटे वेळ काढा. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर ही टेस्ट करणे सोप्पे जाते.
  2. एका बाजूने सुरुवात करून तुमच्या बोटांनी स्क्रोटमला हळूहळू हलक्या हाताने दाबून अंडकोषावरील स्किनवर स्पर्श करून काही जाणवतंय का बघा.
  3. कोणतीही गाठ, सूज आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करा.
  4. लक्षात ठेवा की कर्करोगाच्या ट्यूमरमुळे सहसा वेदना होत नाहीत.
  5. आकारात बदल होत असेल तर त्याकडे लक्ष द्या.
  6. टेस्टिक्युलर कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे वेदना नसलेली गाठ होय.
  7. काही पुरुषांना टेस्टिकल्स आणि स्क्रोटममध्ये सूज येऊ शकते.
  8. कोणतीही सौम्य वेदना जाणवल्यास सावध व्हा.
  9. आता अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचेही अंडकोष तपासा.

(वाचा :- पुरूषहो, डोक्यापासून पायापर्यंत सर्व बंद नसा खोलतात ही 5 फळे, हार्ट फेल ते लैंगिक समस्या कोणताच आजार होत नाही)

गाठ दिसली तर काय कराल?

गाठ दिसली तर काय कराल?

अंडकोष किंवा स्क्रोटममध्ये कोणताही बदल किंवा अनियमितता, जसे की गाठ, सूज किंवा वेदना झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. ही लक्षणे इतर परिस्थितींमुळे देखील उद्भवू शकतात, गरजेचे नाही की हा कॅन्सरच असावा. म्हणून मूळ कारण शोधून काढण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून टेस्टिक्युलर कॅन्सर किंवा इतर कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्यांचा धोका टाळता येईल.
(वाचा :- 10 Foods For Diabetes : हे 10 पदार्थ डायबिटीजसाठी अमृत, किलो किलोने खाल्ले तरी इंचभरही वाढणार नाही Blood Sugar)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts