reduce uric acid level and food to avoid; अचानक हातापायांना मुंग्या येतायत? मग हे उपाय करा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांचे मत

​हार्वर्ड हेल्थच्या मते , जीवनशैली आणि आहारातील बदल करून तुम्ही युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करू शकता. पण बहुतेक प्रकरणांमध्ये, युरिक अ‍ॅसिड किंवा गाउट टाळण्यासाठी केवळ आहारातील बदल करणे पुरेसे नाही. काही वेळा त्याच्या उपचारासाठी या उपायांसह औषधांचीही गरज भासते. तर काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी प्युरीन असलेले पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्हा मोठ्याप्रमाणात आराम मिळू शकतो.

भरपूर फळांचे सेवन

भरपूर फळांचे सेवन

भरपूर फळे, भाज्या आणि शेंगा यासारख्या आहार घ्या. तुमच्या आहारात संपूर्ण धान्याचा समावेश करा. सॅच्युरेटेड फॅट कमी केले पाहिजे. चिकन, मासे आणि टोफूचे सेवन करू शकता. फळांचा फायदा तुमच्या त्वचेला आणि शरीरातील इतर भागात देखील होईल.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया

भोपळ्यामध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे शरीरातून वाढलेला युरिया बाहेर काढण्यास मदत होते. या बिया शरीरात युरिक अ‍ॅसिड जमा होऊ देत नाही. याच्या वापरामुळे संधिरोगाचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे पाचक एन्झाईम्सला प्रोत्साहन देतात आणि प्रथिने पचण्यास मदत करतात. भोपळ्यातील फायटोन्यूट्रिएंट्स गुणधर्म पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. जेवल्यानंतर बडीसोप सोबत तुम्ही भोपळ्यच्या बिया खाऊ शकता.

युरिक अ‍ॅसिड कसे कमी करावे

युरिक अ‍ॅसिड कसे कमी करावे

केवळ वजन कमी केल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होऊ शकते. यासाठी भरपूर द्रव पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. पण साखरयुक्त पेये आणि अल्कोहोल मर्यादित करा कारण या गोष्टी युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवू शकतात.

DASH आहार देखील चांगला आहे

dash-

गाउट किंवा युरिक अ‍ॅसिड टाळण्यासाठी DASH आहार हा देखील एक चांगला पर्याय आहे. संधिवात आणि संधिवातविज्ञान मध्ये प्रकाशित झालेल्या 2016 च्या अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांनी 30 दिवस DASH आहाराचे पालन केले त्यांनी त्यांच्या युरिक अ‍ॅसिडची पातळी सरासरी 0.35 mg/dL ने कमी केली.

गोड खाणं टाळा

गोड खाणं टाळा

तुम्ही जेव्हा गोड पदार्थ खाता तेव्हा युरीक अ‍ॅसिडची पातळी जास्त असते त्यामुळे गोड पदार्थ खाणं ताबडतोब थांबवा. गोड पदार्थांमध्ये फ्रक्टोज असते, जे एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात साखरेच प्रमाण वाढते.

मांस खाणं ताबडतोब सोडून द्या

मांस खाणं ताबडतोब सोडून द्या

असे अनेक मासे आहेत ज्यामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमच्या हातापायांना मुंग्यायेत असतील तर तु्म्ही ताबडतोब लाल मांस, ऑर्गन मीट, मासे, शेलफिश, चिकन आणि अल्कोहोल सोडून द्यावे. 2020 च्या अभ्यासात असे समोर आले आहे की आहारातून प्युरीन काढून टाकल्याने युरीक अ‍ॅसिडची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो शाकाहारी जेवण्याकडे भर द्या.

[ad_2]

Related posts