Stunt Viral Video : धावत्या मालगाडीच्या छतावर 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट, अजय देवगणच्या स्टाइलमधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Greater Noida Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि व्हायरल होण्यासाठी आजची पिढी जीवाचीही पर्वा करत नाही असंच दिसतंय. एका धक्कादायक व्हिडीओने आपले हृदयाचे ठोके चुकतात. प्रसिद्धीच्या हवासापोटी आपली आई वडील घरी वाट पाहत आहे हेदेखील हे तरुण विसरतात का? चित्रपट असो किंवा रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी शो असो…तिथे दाखविण्यात येणारे स्टंट हे पूर्णपणे काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखे खाली केले जातात. 

पण सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओ व्हायरल व्हावा, ट्रेंडिंगमध्ये असावा शिवाय एका रात्रीत आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी जीव धोक्यात घालणं हा कुठला शहाणपणा आहे. आपण अनेक वेळा मुंबईतील रस्ते असो किंवा तुमच्या शहरातील बाइकवर स्टंट करणारे तरुण दिसतात. नुकताच गाजियाबादमधील (Ghaziabad) धावत्या बाइकवर अश्लील चाळे करतानाचा कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Ajay Devgans style 2 youths performing a deadly stunt on the roof of a running train Greater Noida Video Viral on Internet today trending video)

धावत्या मालगाडीवर ते दोघे…

काय म्हणायचं यांना…दोन तरुण धावत्या मालगाडीवर फिल्मी स्टाइल स्टंट करताना दिसून आले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुण शर्टशिवाय जीवाची पर्वा न करता स्टंट करत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना सलमान खान आणि अजय देवगणची आवठण होत आहे. 

या दोघांनी धावत्या मालगाडीच्या छतावर एका डब्यावर एक पाय दुसऱ्या डब्यावर एक पाय असे उभे दिसतं आहेत. धक्कादायक म्हणजे हाय टेन्शन वायरचीही पर्वा केली नाही. कारण या वायरला हात लागतात व्यक्तीचा मृत्यू होतो. 

सोशल मीडियासाठी रील्स बनवायचं हल्ली ट्रेंड आला आहे. त्या करीता यूजर्स मागचा पुढचा कसलाही विचार न करता भयानक आणि धोकादायक कृत्य करतात. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवरील Arvind Chauhan या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणांनो आपलं घरी कोणी वाट पाहत आहे हे कायम लक्षात ठेवा. एका क्षणाच्या प्रसिद्धीसाठी तुमच्या जीव धोक्यात घालणं हे मुर्खपणाचा लक्ष आहे. 

 

Related posts