Horoscope 26 June 2023 : ‘या’ राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहार करताना सतर्क रहावं लागेल!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 26 June 2023 : आजचा दिवस सर्व राशींसाठी संमिश्र असणार आहे. आज गुप्त नवरात्री दुर्गाष्टमीचे व्रत पाळलं जाणार आहे. सोबतच आज मायावी केतू नक्षत्र आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना आज आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 26 june 2023 )

मेष (Aries)

नवीन काम सुरु करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना दक्षता ठेवा. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. 

वृषभ (Taurus)

कार्यश्रेत्रात नवीन जबाबदारी मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. कुटुंबात नवीन व्यक्तीची एन्ट्री होणार. कोर्टकचेरीपासून दूर राहा. 

मिथुन (Gemini)

आज तुमच्या हातातून धार्मिक कार्य घडणार आहे. व्यवसायिकांसाठी चांगला दिवस आहे. कामाची नवीन दिशा ठरेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. 

कर्क (Cancer)

तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. वादविवादापासून दूर राहा नाही तर फटका बसू शकतो. 

सिंह (Leo)

आज जरा आरोग्याची समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. बाहेरगावी जाण्याचा बेत असेल तर वाहनं सावकाश चालवा. कामाच्या ठिकाणी मन उदास राहिल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस टाळा. 

कन्या (Virgo)

घरातील सदस्याच्या तब्येतीमुळे तुम्ही हैराण असेल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. नवीन काही तरी सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

तूळ (Libra)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नवीन काम नवीन जबाबदारी मिळणार आहे. घरातही आनंदचं वातावरण असल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक फायदा होणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

आज गाडी चालवू नका अपघात होण्याची भीती आहे. आरोग्याची कटकट असेल. कुटुंबाता वादविवाद होण्याची शक्यता आहे. हातातील मोठं काम निसटू शकतं. 

धनु (Sagittarius)

आरोग्याबद्दल चिंतेत असणार आहात. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला असेल. भागीदारीत काहीही करु नका अन्यथा मोठं नुकसान होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.  

मकर (Capricorn)

आज लांबच्या प्रवासाचे योग आहेत. नवीन व्यक्तीची आयुष्यात एन्ट्री होणार आहे. अडकलेली कामं सहज मार्गी लागणार आहे. कार्यक्षेत्रात आनंदाची बातमी मिळणार आहे. 

कुंभ (Aquarius)

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. मानसिक ताणताण आज काही प्रमाणात कमी होईल. जोडीदारासोबत संबंध मजबूत होणार आहे. वाहन खरेदीचे योग आहेत. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी गाडी चालवताना काळजी घ्या. मालमत्तेवरुन कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस टाळा. कामाच्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

 

Related posts