Weight Loss And Belly Fat Reduction Using Saffron Water; गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

केशरचे वजन कमी होण्यासाठी उपयोग

केशरचे वजन कमी होण्यासाठी उपयोग

Benefits Of Saffron For Weight Loss: केशर पाणी पिण्याचे फायदे तुम्ही जाणून घेतले तर तुमची सकाळ केशराचे पाणी पिऊनच होईल. केशराचा उपयोग अनादी काळापासून आयुर्वेदामध्ये करण्यात येतो. यातील पोषक तत्वामुळे वजन कमी करण्यासाठी केशराचा उपयोग होतो.

(वाचा – वजन झर्रकन कमी करण्यासाठी समाविष्ट करून घ्या ६ ड्रायफ्रूट्स, लवकरच होईल पोट सपाट)

आरोग्यासाठी फायदेशीर केशर

आरोग्यासाठी फायदेशीर केशर

केशराचा फायदा स्किन टोन चांगला राखण्यासाठी होतो. तसंच केशरामध्ये फायबर आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे आरोग्य अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. याशिवाय त्वचा आणि आरोग्य दोन्ही चांगले राखून वजन कमी होण्यास फायदा होतो. रोज सकाळी केशरचे पाणी प्यायल्यामुळे अनेक आजारही दूर राहतात.

(वाचा – विटामिन बी१२ ची कमतरता भरून काढतील ही फळं आणि भाज्या, वेळीच करा समावेश)

केशर पाण्याचे फायदे

केशर पाण्याचे फायदे

​Kesar Water Benefits: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या अहवालानुसार केशराचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

  • केशर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जा प्राप्त होण्यास मदत मिळते
  • केशराच्या पाण्यामुळे केसगळतीच्या समस्या रोखण्यासाठी फायदा होतो
  • केशर तुमची त्वचा अधिक चमकदार बनवते हृदयाच्या आरोग्यासाठी केशर उत्तम समजण्यात येते
  • मासिक पाळीच्या दिवसात केशर सेवन केल्याने त्रासापासून सुटका मिळते हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे
  • उपाशीपोटी केशर पाणी पिण्यामुळे पोट भरल्यासारखे राहाते आणि पटकन भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन झरझर कमी होण्यास मदत मिळते

(वाचा – ब्रश केल्यानंतरही दिसत असतील पिवळे दात तर सकाळीच खा हा काळा पदार्थ, हास्याने लागेल लोकांना वेड)

कसे बनवाल केशराचे पाणी

कसे बनवाल केशराचे पाणी

How To Make Saffron Water: केशर पाणी बनविण्यासाठी एक कप पाण्यात थोडेसे केशर घाला आणि त्यात दालचिनी आणि वेलची घालून पाणी ५ मिनिट्स उकळवा. त्यानंतर हे पाणी थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर त्यात मध मिक्स करा आणि मग सेवन करा.

लक्षात ठेवा पाणी खूप गरम असेल तर त्यात मध मिक्स करू नका. गरम पाण्यात मध मिक्स केल्यास त्यातील पौष्टिक तत्व नष्ट होतात. नियमित केशर पाण्याचे सेवन केल्यास, वजन कमी होण्यास मदत मिळते.

संदर्भ

https://www.indiakashmirsaffron.com/loose-weight-with-saffron-water/

https://health.clevelandclinic.org/benefits-of-saffron/

https://www.drbrahma.com/saffron-health-benefits-drinking-saffron-water-is-immensely-beneficial-for-your-health/

[ad_2]

Related posts