Drumstick And Curry Leaves Health benefits to increase immunity Good Health; शरीरासाठी अमृतासमान आहेत या दोन भाज्या, पावसाळ्यातील आजार बाजूला फिरकणार पण नाहीत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​शेवग्याची शेंग

​शेवग्याची शेंग

शेवग्याच्या शेगांना इंग्रजीत ड्रमस्टिक असे म्हटले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी१, बी२, बी३, बी ६, फोलेट आणि कॅल्शियम, पोटॅशियम, लोह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.

​(वाचा – चाळीशीनंतर महिलांना हाडेदुखी आणि हार्मोनल बदलांचा सामना करावा लागतो, बाबा रामदेव यांच्या टिप्स)​

​कढीपत्ता

​कढीपत्ता

कढीपत्त्यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन ए आणि बी भरपूर प्रमाणात भरलेले आहे. १०० ग्रॅम कढीपत्त्यामध्ये ९७ कॅलरीज, सॉल्यूबल आणि इनसॉल्यूबल फायबर मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच वाढलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि पोट साफ ठेवण्यासाठी कढीपत्त्याची मदत होते.

​(वाचा – २०११ च्या वर्ल्डकपवेळी MS Dhoni खात होता ‘हा’ पदार्थ, पाहा कॅप्टन कूलचा डाएट प्लान, जिम वर्काऊट रूटिन)​

​शेवग्याच्या शेंग्यामुळे हे आजार राहतात दूर

​शेवग्याच्या शेंग्यामुळे हे आजार राहतात दूर

शेवग्याच्या शेंग्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. पावसात रोगप्रतिकार शक्तीची गरज नितांत असते. यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. यामध्ये असणाऱ्या एंटीऑक्सिडेंट्स शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच केस आणि स्किनकरताही याचा फायदा चांगला होतो.

​कढीपत्त्यामुळे हे आजार राहतात दूर

​कढीपत्त्यामुळे हे आजार राहतात दूर

कढीपत्त्यामुळे गॅस, ऍसिडिटी आणि पोट फुगण्यापासून बचाव होत. या समस्यांपासून दूर करून पचनक्रिया कढीपत्त्यामुळे सुधारते. कढीपत्त्यामुळे शरीरातील टॉक्सिंसबाहेर निघून जाते आणि एक्स्ट्रा फॅट कमी होण्यास मदत होते.

​(वाचा – Weight Loss Tips: या तेलाच्या वापराने लोण्यासारखी वितळेल चरबी, महिन्याभरात दिसेल कमालीचा रिझल्ट)​

​पावसाळ्यात या आजारांपासून राहा दूर

​पावसाळ्यात या आजारांपासून राहा दूर

हिरव्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. त्यावर बसलेले बारीक हिरवे किडे अनेकवेळा दिसत नाही आणि ते आपल्या पोटात जाण्याची भीती असते. पालेभाज्यांमध्ये इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात जास्त प्रमाणामध्ये माती आणि चिखल देखील लागलेला असतो. जरी पालेभाज्या स्वच्छ धुवून घेतल्या तरी त्यावरचे जंतू निघून जातात असं नाही.

कोबी, फ्लॉवर आणि पालक यांसारखे पदार्थ खाऊ नये कारण पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये अनेकदा न दिसणारे कीटक असतात. या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या उद्भवतात. कच्चे किंवा न शिजवलेले अन्न खाणं तसेच विशेषत: रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खाल्ल्याने अन्नजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, ही माहिती डॉ. रावसाहेब राठोड, पोटविकार तज्ज्ञ, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्यूटिक एंडोस्कोपिस्ट, मेडिकोव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी दिली आहे.

[ad_2]

Related posts