Constipation 5 Main Reasons Impact On Health; Constipation समस्या होण्यामागे आहेत ५ कारणं, वेळीच घ्या जाणून आणि करा उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अधिक मीठ-मिरचीच्या पदार्थांचे सेवन

अधिक मीठ-मिरचीच्या पदार्थांचे सेवन

एक्सपर्टनुसार, अधिक मिठाचे पदार्थ सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. तसंच तुम्ही जेवणामध्ये अधिक मिरचीचे अथवा तिखट पदार्थाचे सेवन करत असाल तरीही तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. लाल मिरची खाल्ल्याने पोटात अल्सरचा त्रासही होतो. यामुळे पोटातील उष्णता वाढते आणि त्यामुळेच मीठ-मिरची अधिक खाणे टाळावे.

झोप पूर्ण न होणे

झोप पूर्ण न होणे

झोप पूर्ण न झाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. यामुळे पोटाची समस्या अधिक प्रमाणात होऊ शकते. झोप पूर्ण न झाल्याने पचनशक्ती कमकुवत होते आणि यामुळे Gut Health देखील खराब होते. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण आणि पोट साफ होत नाही आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढीला लागते.

(वाचा – Weight Loss Breakfast: त्वरीत वजन कमी करण्यासाठी खा असे सुपरफूड्स, गायब होईल पोटावरील लटकलेली चरबी)

एका जागी बसून राहणे

एका जागी बसून राहणे

बद्धकोष्ठतेची समस्या होण्यामागे एका बाजूला बसून राहणे हेदेखील मुख्य कारण आहे. तुम्ही दिवस जर एका जागी ऑफिसमध्ये बसून राहात असाल, तुमच्या दैनंदिन आयुष्यात चालणे – फिरणे अत्यंत कमी होत असेल तर बद्धकोष्ठतेची समस्या वाढीला लागते. याशिवाय गॅस आणि ब्लोटिंगची समस्या झाल्यामुळे बद्धकोष्ठता वाढीला लागते.

(वाचा – रिकाम्या पोटी केळं खाण्याचे ७ फायदे, वजन कमी करण्यापासून शुगरवर नियंत्रण ठेवेपर्यंत जबरदस्त लाभ)

तणाव

तणाव

तणाव आपल्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम करून देताना दिसतो. पोट नीट स्वच्छ न होण्यामागे तणाव हे एक कारण आहे. तणावाच्या कारणाने हार्मानल असंतुलन होते आणि ज्याचा सरळ परिणाम पचनतंत्रावर होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.

(वाचा – वजन वाढण्यासह येत असेल अति घाम तर मृत्यूच्या जवळ जाणाऱ्या गंभीर आजाराचे आहेत हे ५ संकेत)

पाणी कमी प्रमाणात पिणे

पाणी कमी प्रमाणात पिणे

शरीरामध्ये असणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात जाणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी कमी शरीरात गेले तर मलत्याग करणे अत्यंत कठीण होते. जेवण पचत नाही. पाणी व्यवस्थित न पिण्यामुळे डिहायड्रेशनसह बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. पोट स्वच्छ न होणे हे सर्वात मोठे कारण आहे.

संदर्भ

https://my.clevelandclinic.org/health/diseases/4059-constipation

https://www.health.harvard.edu/diseases-and-conditions/common-causes-of-constipation

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5976340/

[ad_2]

Related posts