[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
वजन कमी करण्यासाठी
Soaked Chana For Weight Loss: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि पोटावरील चरबी जाळण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुम्ही उपाशीपोटी नियमित चण्याचे सेवन करावे. चण्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते आणि यामुळे अधिक काळ भूक लागत नाही. ओव्हरइंटिंग करण्यापासून तुम्ही वाचता आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तुम्ही नाश्त्यासाठी भिजवून उकडलेले चणे नक्कीच खाऊ शकता.
पचन कार्यात होते सुधारणा
Soaked Chana For Digestion: पचनशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही रोज भिजवलेले चणे खाऊ शकता. यामध्ये असणाऱ्या फायबरच्या प्रमाणामुळे पचनक्रिया चांगल्या पद्धतीने होते. फायबर हे आतडे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून फेकण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला पचनक्रियेची समस्या असेल तर चण्याचा तुमच्या आहारात नक्की समावेश करून घ्या. भिजवलेल्या चण्यामुळे ही समस्या कमी होते.
( वाचा – १४० किलो वजन असणाऱ्या अर्जुन कपूरने १५ महिन्यात घटवले, लटकत्या पोटाच्या चरबीनंतर मिळवले अॅब्ज)
हृदय निरोगी ठेवण्यासाठी
Soaked Chana For Heart: भिजवलेले चणे नियमित खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होते. कारण चण्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि एंथोसायनिनी हे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करते. याशिवाय चण्यात असणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियमदेखील हृदयासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल तर नियमित चणे भिजवून खावेत.
(वाचा – पाण्यात मिसळा हे 5 पदार्थ, पोटात चिकटलेली सर्व घाण जाईल त्वरीत बाहेर)
कोलेस्ट्रॉल ठेवते नियंत्रणात
भिजवलेले चणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. काळ्या चण्यामध्ये अधिक फायबर असून ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. Netmeds ने केलेल्या अभ्यासानुसार, रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्याने ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. २-३ चमचे चणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी खावे. मात्र हे चणे तेलात भाजून खाऊ नका. उकडून खाणे उत्तम ठरेल.
(वाचा – सांधेदुखी आणि किडनीला हानी पोहचवते युरिक अॅसिड, ४ फळं-भाज्यांचा समावेश करून करा फ्लश आऊट)
रक्ताची कमतरता होईल कमी
चण्यामध्ये लोहाचे प्रमाणही अधिक असते. तुम्ही जर रोज भिजवलेले चणे प्रमाणात खाल्ले तर एनिमियासारख्या समस्यांपासून दूर राखण्यास मदत करतात. लोह हे लाल पेशींचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो आणि रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय रोज चणे भिजवून खाल्ल्यास दिवसभर तुम्हाला शरीरात उत्साहही जाणवेल.
[ad_2]