( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News : बिहारच्या (Bihar Crime) समस्तीपूर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. समस्तीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाला अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली आहे. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून पिता-पुत्राने अल्पवयीन मुलाला दोरीने बांधून नऊ तास मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
समस्तीपूरमध्ये 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी 16 वर्षांच्या मुलाला नऊ तासांपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून दुकानदार आणि त्याच्या मुलाने मुलाचे हातपाय बांधून त्याला भर गावासमोर बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपी दुकानदाराने गाडी साफ करण्याच्या प्रेशर पाईपने मुलाच्या चेहऱ्यावर पाण्याचा मारा केला. मुलगा रडत होता आणि मदतीसाठी याचना करत होता. पण कोणीही त्याला मदत केली नाही. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली.
4 जुलै रोजी मोती शाह नावाच्या दुकानदाराने आरोप केला की अल्पवयीन मुलाने दुकानातून 1 रुपयाचे चॉकलेट चोरले होते. त्यानंतर मोती शाह आणि त्याचा मुलगा अमरदीप साहू याने मुलाचे हात पाय बांधेल आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रेशर पाईपने त्याचा चेहऱ्यावर पाणी मारले. यासोबत त्याला काठीनेही मारहाण केली. आजूबाजूला खूप लोकांची गर्दी होती. मात्र मुलाला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मारहाणीच्या वेळी पंचायतीचे प्रमुखही तिथेच उपस्थित होते. असे पीडित मुलाने सांगितले. मुलाने सांगितले की, मला वाचवण्याऐवजी पंचायत प्रमुख माझी किडनी काढून विकून टाका असे वारंवार सांगत होते.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलाला सोडवलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करून त्याला घरी पाठवले. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पोलिसांनी पीडित मुलाच्या घरी पोहोचून त्याला कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आणले आणि गुन्हा नोंदवला. गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
बिहार: समस्तीपुर में एक बिस्कुट चोरी करने के आरोप में बाप-बेटे ने एक 14 वर्ष के नाबालिग बच्चे को पेड़ से बांधकर पीटा। घटना का वीडियो वायरल हुआ।
SP विनय तिवारी ने बताया, “एक 14 वर्ष के बच्चे ने मोती और अमरदीप साहू के घर से बिस्कुट चुराया था जिसके बाद इन दोनों बाप-बेटे ने इस बच्चे… pic.twitter.com/jNdJCM8u1G
— ANI_HindiNews (@AHindinews) July 5, 2023
पोलिसांनी काय सांगितले?
“मोती आणि अमरदीप साहू यांच्या दुकानातून 14 वर्षांच्या मुलाने चॉकलेट चोरले असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही पिता-पुत्रांनी मुलाला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. व्हायरल व्हिडिओच्या आधारे दोघांची ओळख पटली. आम्ही दोघांना अटक केली आहे,” असे समस्तीपूरचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांनी सांगितले.