[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
डाळिंब
डाळिंबाच्या लाल रंगाच्या दाण्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे लिव्हर आणि किडनीसह रक्तदेखील शुद्ध होण्यास मदत मिळते. डाळिंबाच्या दाण्यामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम आढळते, जे किडनीच्या स्वच्छतेसाठी अधिक गुणकारी ठरते.
किडनी स्टोन होण्यापासूनही वाचवण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या दाण्याचे सेवन करू शकता. हे लिव्हर आणि किडनीमधील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
लाल द्राक्ष
Medicine Net ने दिलेल्या अहवालानुसार, लाल द्राक्षामध्ये किडनी डिटॉक्स करणारे पोषक तत्व असतात. लालभडक रंगाच्या या द्राक्षामध्ये फ्लेवेनॉईड असून किडनची सूज कमी करण्यासाठी याची मदत मिळते. यासह अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात, जे किडनी आणि लिव्हरच्या आत जाऊन स्वच्छता करण्यास मदत करतात.
(वाचा – कमीत कमी कोणत्या वयात मुलं होऊ शकतात बाप, वडील होण्याचे योग्य वय कोणते काय सांगतं विज्ञान)
बेरीज
बेरीजमध्ये स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी, ब्लूबेरी, रास्बेरी इत्यादीचा समावेश असतो. त्यापैकी स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असून किडनी आणि लिव्हरच्या सेल्समधील अँटीऑक्सि़ंट्स ताण आणि इन्फ्लेमेशन कमी करण्यास मदत करतात. वास्तविक स्ट्रॉबेरीला लिव्हर आणि किडनी डिटॉक्स ज्यूस असेही म्हटले जाते. न्यूट्रिशन जर्नलनुसार, रोज बेरीज ज्यूस पिण्यामुळे युरीन इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
(वाचा – शंकराला वाहिले जाणारे बेलपत्र आहे आरोग्यासाठी फायदेशीर, डायबिटीसपासून बद्धकोष्ठतेवर गुणकारी)
फ्रूट ज्यूस
लेमन, संत्र आणि टरबूजचा एकत्रित ज्यूस हा किडनी आणि लिव्हरच्या दोन्हीच्या स्वच्छतेसाठी याचा फायदा मिळतो. फ्रूट ज्यूसच्या कारणामुळे किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. लिंबू, संत्र आणि टरबूज हे शरीरातील फ्लुईड संतुलित राखण्यास मदत करतात.
(वाचा – कमी वयात दात सडून कमकुवत होण्यामागे हे आहे मोठं कारण, वेळीच करा उपाय नाहीतर तरूणपणीच लागेल कवळी)
टरबूज
टरबूज हे लाल फळ मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सने युक्त असून किडनी आणि लिव्हरमध्ये इन्फ्लेमेशन कमी करण्यास मदत करते. तसंच टरबूज हे किडनीतील फॉस्फेट, ऑक्झिलेट, सायट्रेट आणि कॅल्शियम संतुलित करण्यासाठीही मदत करते.
संदर्भ
https://www.medicalnewstoday.com/articles/325391
https://sunwarrior.com/blogs/health-hub/12-of-the-best-foods-for-kidney-health-detox-and-cleansing
[ad_2]