पोटाची खळगी भरण्यासाठी मातेवर काय ही वेळ आली? एका हातात मूल, दुसऱ्या हातात हँडल , Video of a woman driving an e-rickshaw with her toddler is viral

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Woman Driving e-rickshaw Video Viral : जगात आईच्या प्रेमाची तुलना कोणीही करु शकत नाही. असाच एक प्रसंग रस्त्यावर पाहायला मिळाला. आपल्या मुलाला सोबत घेऊन एक महिला पोटाची खळगी भरण्यासाठी एका हातात मूल आणि दुसऱ्या हातात ई-रिक्षाचे हँडल पकताना दिसून आली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत.

या महिलेचे तान्हे बाळ असल्याने ती त्याला सोबत घेऊन रिक्षा चालवत आहे. आपल्या तान्ह्या बाळाला दुसरीकडे ठेवू शकत नाही. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी ती आपल्या बाळाला सोबत घेऊन प्रवासी भाडे मारत आहे. ही महिला सामान्य रिक्षावाल्याप्रमाणे ई-रिक्षा चालवताना दिसून यत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, तो दिल्ली किंवार आसपासच्या राज्यातील असावा, अशी शक्यता आहे. 

सध्या समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक महिला एका मुलाला आपल्या मांडीवर घेऊन ई-रिक्षा चालवत आहे. आपल्या मुलांसाठी काही मातांनी असा त्याग केला आहे की, त्यांना देवाच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो. आपल्या मुलाचे भवितव्य सुधारण्यासाठी घराची काळजी घेण्यापासून ते बाहेरच्या कामापर्यंत सर्वच बाबतीत माता नेहमीच पुढे असतात. आता आपल्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी संभाळण्यासाठी या मातेला मोठी कसरत करावी लागत आहे. आपल्या तान्ह्या बाळाला संभाळत ती रिक्षा चालवत आहे.

एका हातात हँडल आणि दुसऱ्या हातात बाळ

ई-रिक्षा चालवणाऱ्या एका महिलेच्या मांडीवर तान्हुळे बाळ आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पैसे कमवण्यासाठी या मातेला घर सोडावे लागत आहे. असे असले तरी ती निरागस मुलाची काळजी घेण्यास प्राधान्य देत आहे. महिलेचा एक हात ई-रिक्षाच्या हँडलवर असून दुसऱ्या हाताने तिने मुलाला मांडीवर धरले आहे.  

याचा व्हिडिओ @viralbhayani च्या Instagram पेजवर शेअर करण्यात आला आहे. यानंतर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये महिला सायकल चालवत आहे आणि दुसऱ्या हातात लहान बाळ आहे.

अनेकांच्या प्रतिक्रिया

एका युजरने म्हटलंय, या मातेला सरकारकडून मदत मिळायला हवी, तर कोणी म्हटले की तिची आर्थिक स्थिती किती वाईट असेल की तिला या स्थितीत काम करावे लागेल. तर दुसऱ्या यूजरने म्हटलंय जगातील प्रत्येक आईला सलाम. आईची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही. आणखी एका यूजरने लिहिले आहे, या जगातील सर्वात भाग्यवान लोक ते आहेत ज्यांना आई आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला गेला असून लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत.

Related posts