[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लिंबाचा रस
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळून प्या. यामुळे पोट चांगले स्वच्छ होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
मध सह आराम
मधाचा वापर करून बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही मात करता येते. यासाठी कोमट पाण्यात १ चमचा मध मिसळून प्या. कोमट पाण्यात मध मिसळून नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
आल्याचा उपयोग
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचे सेवन करा. आल्याचे सेवन करण्यासाठी सकाळी उठल्यावर १ ग्लास पाणी गरम करावे. आता १ तुकडा आले किसून टाका. काही वेळ पाणी गरम करा. हे पाणी चहासारखे प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
(वाचा:- Tooth Decay : दातांच्या दुखण्याला करा बाय बाय… या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दात होतात खराब)
एरंडेल तेल फायदेशीर आहे
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एरंडेल तेलाचे काही थेंब टाकून प्या. सकाळी तुमचे पोट चांगले साफ होईल. दुधात एरंडेल तेल मिसळून ते नियमित प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते. हा उपाय केल्याने सकाळी तुम्हाला आराम मिळेल.
(वाचा :- खोकल्यानंतर पोटात अचानक दुखतंय? लघवी होण्यात अडचण होतेय? वेळीच ओळखा हर्नियाची ही महाभयंकर लक्षणे)
आळीवाचा असा करा वापर
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी डॉ. रोहिणी पाटील यांनी काही उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये त्यांनी आळीवाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही काही आळीव पाण्यात टाकून त्याची उकळून घ्या. या पाण्याच्या वापराने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवता येतो.
गरम पाण्यामध्ये तुपाचा असा करा वापर
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाण्यामध्ये तुपाचा असा करा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.
[ad_2]