[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हळदीमुळे दातांना चमक
हळद हे नैसर्गिक अँटिसेप्टिक असून औषधाप्रमाणे याचे सेवन केले जाते. यामध्ये अँटीफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुण असतात, जे दातातील इन्फेक्शनचा धोका कमी करण्यास मदत करते.
हळदीचा वापर केल्याने दातातील त्रास, पिवळेपणा आणि दाताच्या इतर समस्या सोडविण्यास फायदा होतो. दातांमध्ये हिऱ्यांसारखी चमक आणण्यास मदत करते. याशिवाय दातांच्या हिरड्यातील सूज कमी होते.
(वाचा – पोटात सतत गॅस निर्माण होऊन पादायचा होतोय त्रास, तर करा ५ सोपे घरगुती उपाय)
नारळाच्या तेलाचा उपयोग
नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते, जे दाताच्या समस्येचा धोका कमी करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असून ओरल हेल्थ चांगले राखण्यास मदत करते आणि याचा वापर दात मोत्यासारखे चमकविण्यासाठी आणि दात मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
(वाचा – आता वाढलेल्या शुगरवर करा स्वस्तात मात, शरीराला पोखरणारा डायबिटीस होईल झर्रकन कमी रिसर्चमधून झाले सिद्ध)
कसा करावा याचा उपयोग
दातांसाठी नारळाचे तेल आणि हळदीचा तुम्ही २ पद्धतीने वापर करू शकता. कसे ते जाणून घ्या
पहिली पद्धत – अर्धा चमचा नारळाचे तेल घ्या आणि चिमूटभर हळद मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट बोटावर घ्या आणि दातांवर घासा. तुम्हाला हवं तर तुम्ही ब्रशचाही वापर करू शकता. कमीत कमी २-३ मिनिट्स मसाज करा. त्यानंतर चूळ भरा
दुसरी पद्धत – आपल्या टूथपेस्टसह अर्धा चमचा नारळ तेल आणि हळद मिक्स करा. त्यानंतर ब्रशवर हे मिश्रण घ्या आणि दात घासा. काही दिवसातच तुम्हाला तुमचे दात मोत्यासारखे चमकलेले दिसू लागतील
(वाचा – युरिक अॅसिड उच्च असणाऱ्यांनी चहा प्यावा की कॉफी, काय सांगतो अहवालhttps://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/tea-or-coffee-best-drink-option-for-high-uric-acid-patients/articleshow/101729339.cms)
कोकोनट ऑईल पुलिंग
दातांवर नारळाच्या तेलाचा उपयोग तुम्ही करणार असाल तर Coconut Oil Pulling चा देखील तुम्ही करू शकता. दात अधिक मजबूत करण्यासाठी आणि दाताचा पिवळटपणा घालविण्यासाठी ऑईल पुलिंग हा चांगला उपाय आहे. २-३ मिनिट्स तोंडात नारळाचे तेल ठेऊन नंतर चूळ भरून टाकायची. यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही आणि दात मजबूत राहतात.
[ad_2]