Worst Food Triggers Uric Acid In Body Avoid 4 Type Of Foods; युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांसाठी ४ पदार्थ ठरतात विष, वेळीच व्हा दूर नाहीतर गमवाल जीव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

का वाढते युरिक अ‍ॅसिड

का वाढते युरिक अ‍ॅसिड

नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागातील वरीष्ठ सल्लागार डॉ. अमरेंद्र पाठक यांच्या सांगण्यानुसार युरिक अ‍ॅसिडची समस्या अनेकदा चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे अथवा सवयीमुळेही वाढते. हाय प्रोटीन पदार्थांच्या सेवनाने शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढते आणि गाठी होणे अथवा सांधेदुखी होण्यास सुरूवात होते.

युरिक अ‍ॅसिडची समस्या असणाऱ्या रूग्णांनी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच नियमित स्वरूपात व्यायाम आणि औषधांकडेही लक्ष द्यायला हवे. याशिवाय नियमित तपासणीही करावी असं डॉक्टरांनी सांगितले.

नॉनव्हेजपासून राहा दूर

नॉनव्हेजपासून राहा दूर

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी नॉनव्हेज पदार्थांपासून पूर्णतः लांब राहायला वहे. या पदार्थांच्या सेवनाने युरिक अ‍ॅसिड अत्यंत वेगाने शरीरात वाढते आणि याचा परिणाम त्वरीत किडनीवर होतो.

विशेषतः लाल मांस आणि मच्छी हे पदार्थ युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांसाठी सर्वाधिक नुकसानदायी ठरते. वास्तविक या पदार्थांमध्ये प्युरीनचे अधिक प्रमाण असते, जे युरिक अ‍ॅसिड वाढविण्यास मदत करते. सांधेदुखीचा त्रास यामुळे वाढू शकतो. नॉनव्हेज पदार्थ टाळल्याने युरिक अ‍ॅसिडची समस्याही कमी होऊ शकते.

(वाचा – १ महिना साखर न खाल्ल्यास काय होतो आरोग्यावर परिणाम, शरीराला किती साखर आवश्यक)

जंक फूड्सचे सेवन

जंक फूड्सचे सेवन

सोडा, कोल्ड ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स, शुगरी ज्युस आणि जंक फूड्सच्या सेवनामुळेही युरिक अ‍ॅसिडचा स्तर अधिक वाढतो. या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढून सांधेदुखी आणि किडनीवर परिणाम होऊन निकामी होण्याचा अधिक धोका असतो. काही जणांना कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सतत सवय असेल तर ती त्यांनी वेळीच सोडून देणं फायदेशीर ठरले.

(वाचा – सोडा, कोल्ड ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स, शुगरी ज्युस आणि जंक फूड्सच्या सेवनामुळेही युरिक अ‍ॅसिडचा स्तर अधिक वाढतो. या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढून सांधेदुखी आणि किडनीवर परिणाम होऊन निकामी होण्याचा अधिक धोका असतो. काही जणांना कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सतत सवय असेल तर ती त्यांनी वेळीच सोडून देणं फायदेशीर ठरले. )

दारूचे सेवन बंद करावे

दारूचे सेवन बंद करावे

युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांसाठी दारू हे विष ठरते. दारूच्या सेवनाने युरिक अ‍ॅसिड तर वाढतेच याशिवाय तुमच्या आरोग्यासाठी दारू ही नुकसानदायी ठरते. हेल्दी डाएटचा अवलंब करावा आणि दारूचे व्यसन असेल तर ते वेळीच सोडावे, अन्यथा किडनी निकामी होऊन तुम्हाला तुमचा जीवही गमवावा लागू शकतो.

(वाचा – पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी काय खावे, श्री श्री रवि शंकर यांनी शेअर केले वेट लॉस सिक्रेट)

हाय प्रोटीन आणि हाय फॅट्स फूड

हाय प्रोटीन आणि हाय फॅट्स फूड

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी हाय प्रोटीन आणि हाय फॅट्स फूड खाणे हे हानिकारक ठरू शकते. याचे सेवन केल्याने युरिक अ‍ॅसिडची शरीरातील पातळी वाढते. युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी डाळींचे सेवनही कमी प्रमाणात करावे. तसंच लो फॅट्स डेअर प्रॉडक्ट्सचा आपल्या आहारात समावेश करून घ्यावा. हाय प्रोटीन डाएट हे युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांसाठी नुकसानदायी ठरते.

[ad_2]

Related posts