Figs Anjeer rich food in calcium vitamins protein omega and its helps weight loss and Constipation; कॅल्शियम, व्हिटॅमिन, फेनोल, ओमेगाने समृद्ध आहे हे फळ, पाण्यात भिजवून खाल तर १०० टक्के होईल फायदा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​बद्धकोष्ठता मध्ये फायदेशीर

​बद्धकोष्ठता मध्ये फायदेशीर

अंजीर, ताजे किंवा सुकवलेले असो. त्यामध्ये उच्च सेल्युलोज सामग्री आणि तिची कडक त्वचा यामुळे एक विश्वासार्ह रेचक मानले जाते. फळांच्या लहान बियांमध्ये पेरिस्टॅलिसिस किंवा आतड्यांच्या लहरीसारख्या हालचालींना उत्तेजित करण्याचा गुणधर्म असतो. ज्यामुळे अन्ननलिका स्वच्छ राहते, म्हणून ते बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर आहे.

​वजन कमी करण्यास मदत करते

​वजन कमी करण्यास मदत करते

अंजीर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. लठ्ठ लोकांना याचे सेवन केल्याने खूप फायदा होतो. पण अंजीराच्या अतिसेवनाने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते हेही लक्षात ठेवले पाहिजे. पण प्रमाणात खाल्ल्यास नक्की फायदे होतील.

​​​(वाचा – Vegan Raw Food Diet : कच्चे विगन फूड खाल्ल्यामुळे इन्फ्लुएन्सरचा मृत्यू, जाणून घेऊया डाएटचे नुकसान)

​हाडांसाठी चांगले

​हाडांसाठी चांगले

अंजीर खाणे हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण त्यात कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हाडांना टणक बनवण्यासाठी अंजीर खाणे आवश्यक असते. अगदी वृद्ध काळात किंवा तरूण वयात हाडांच्या आरोग्यासाठी अंजीर खावे.

​(वाचा – दीर्घकाळ काम केल्यामुळे लोअर बॅक पेन आणि मान दुखीच्या त्रासावर ७ रामबाण उपाय, दुखणं होईल छुमंतर)​

डोकेदुखी आराम

डोकेदुखी आराम

अंजीर हे बहुमुखी फळ आहे. त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळण्यास खूप मदत होते. जर एखाद्याला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याने अंजिराच्या झाडाची साल बारीक करून त्याची पेस्ट डोक्यावर करावी. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.

​​(वाचा – सिद्धार्थ चांदेकरने ६ महिन्यात घटवलं १६ किलो वजन, १०३ किलोवरून.. असं म्हणतं शेअर केली पोस्ट)

​कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

​कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

अंजीरमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. यामध्ये असलेले फायबर तुमच्या पचनसंस्थेतील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल सहज साफ करते.

​​(वाचा – Chankaya Niti : कायम तंदुरूस्त राहण्यासाठी फॉलो करा चाणक्य नीतिमधील या ५ गोष्टी)

​हृदयरोग प्रतिबंधित करा​

​हृदयरोग प्रतिबंधित करा​

कोरोनरी हृदयरोग हा एक अत्यंत घातक रोग आहे जो मुख्य रक्तवाहिन्यांना त्याचा बळी बनवून रक्तप्रवाहात व्यत्यय आणतो. अंजीर खाल्ल्याने तुमच्या रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी कमी होते.

​​(वाचा – कढीपत्ता पाण्यात उकळून पिण्याचे ७ आरोग्यदायी फायदे, Body Detox सह ६ आजार होतील दूर)

आतड्याची जळजळ टाळता येते

आतड्याची जळजळ टाळता येते

आतडे निरोगी असल्यास अनेक आजारांपासून बचाव होतो. आतड्यांसंबंधी विकार असलेले लोक अंजीर वापरू शकतात. अनेक आतड्यांचे विकार दूर करण्यासाठी अंजीर खूप मदत करते. याचे सेवन केल्याने आतड्याची जळजळ दूर होते.

(वाचा – सायलेंट किलर आहे Osteoporosis, हाडे ठिसूळ होण्याच्या १ महिना आधीच दाखवतात ८ लक्षणे, अजिबात दुर्लक्ष करू नका)

भिजवून अंजीर खाण्याचे फायदे

भिजवून अंजीर खाण्याचे फायदे

३ ते ४ अंजीर पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यावर पहिला पदार्थ अंजीर खा. यासोबतच हे पाणी देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. यामुळे वरील सर्व फायदे मोठ्या प्रमाणात आणि १०० टक्के होतील.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

​घसा खवखवण्यापासून आराम

​घसा खवखवण्यापासून आराम

अंजीराच्या सेवनाने तुमच्या घशाचा त्रास तर कमी होतोच, पण घशातील सूज कमी करण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे. खोकला आणि श्वसनाचे इतर विकार दूर करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.

​​(वाचा – दीर्घकाळ काम केल्यामुळे लोअर बॅक पेन आणि मान दुखीच्या त्रासावर ७ रामबाण उपाय, दुखणं होईल छुमंतर)

[ad_2]

Related posts