PM Modi Loksabha Speech Live No-confidence motion lucky for Modi government? PM Modi told a secret in the Lok Sabha | PM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Narendra Modi in Lok Sabha LIVE: लोकशाहीमध्ये सरकारवर नियंत्रण ठेवणारा ‘अविश्वास प्रस्ताव’ विरोधकांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये मांडला. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत आपली भूमिका मांडली. आज अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी मोदींनी उत्तर देताना विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विकास कामांचा सातबारा वाचून दाखवला. मात्र, मणिपूर प्रकरणावर स्पष्टीकरण न दिल्याने विरोधकांनी रोजदार राडा घातल्याचं दिसून आलं.

लोकसभेत काय म्हणाले नरेंद्र मोदी? 

विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली. मात्र, अजूनही काही लोक जगात आपल्या प्रतिमेवर डाग लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली. त्यावेळी त्यांनी लोकसभेत गुपित सांगितलं. मला विरोधी पक्षाच्या लोकांना एक गुप्त वरदान मिळालं आहे. जे लोक माझ्याविषयी वाईट बोलतात. माझं वाईट चिततात. एक उदाहरण तर तुमच्यासमोर उभं आहे, 20 वर्षं झाली… माझ्याविरुद्ध काय काय केलं नाही. पण माझं भलंच होत गेलं. त्यामुळे विरोधकांचं हे गुप्त वरदान आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

आणखी वाचा – जिथं राजा आंधळा असतो तिथं द्रौपदी वस्त्रहरण होतं…; अधीर रंजन चौधरी यांची नरेंद्र मोदींवर सडकून टीका!

नरेंद्र मोदी यांनी यावेळी तीन उदाहरणं दिली. बँकिंग क्षेत्र, एचएएल आणि एलआयसीवर बोलताना त्यांनी काँग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडलं.  आपल्या सार्वजनिक बँकांचा निव्वळ नफा दुप्पट झाला. आमच्या सरकारने भारताच्या तरुणांना घोटाळे नसणारं सरकार दिलं. भारताच्या तरुणांना खुल्या आकाशात भरारी घेण्याची संधी दिली. त्यामुळे जगाचा विश्वास वाढत चालला आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, 2014 मध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आणलं. त्यानंतर 2019 मध्येच त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आता तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं, त्यामुळे 2028 मध्ये जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा देश तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनलेली असेल, असं म्हणत मोदींनी पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. 

Related posts