किचनमधील १ चिमूटभर मसाला करेल गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या छूमंतर, रोज करा सेवन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोटाशी संबंधित समस्या हल्ली अनेकांना होताना दिसून येत आहेत. विशेषतः पावसाळ्यात तर पोटदुखी वाढणे हे कॉमन आहे. पावसाळ्यात पचनसमस्या आणि गॅसच्या अथवा बद्धकोष्ठता समस्या अधिक प्रमाणात होतात. कारण या काळात डायजेशन सिस्टिम बऱ्याच जणांची बिघडते. थोडेसे जरी मसालेदार पदार्थ खाल्ले तरीही पोट बिघडते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनावर किचनमधील एक मसाला अत्यंत गुणकारी ठरतो आणि हा पदार्थ म्हणजे हिंग. चिमूटभर हिंगानेही ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. हिंगातील गुणधर्म हे पोटातील समस्या दूर करण्यास मदत करतात. WebMD ने केलेल्या अभ्यासानुसार, हिंग केवळ पचनशक्तीसाठी नाही तर बद्धकोष्ठता, गॅस समस्या दूर करण्यासही उपयुक्त ठरते. याशिवाय यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूसाठीही उपयुक्त ठरते. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts