भाच्यानेच केला मामीवर बलात्कार, म्हणाला ‘व्हिडीओ व्हायरल करेन, नाही तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासह प्रत्येकी 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. याप्रकरणी 2019 मध्ये कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. कोर्टात सुनावणीदरम्यान एकूण 7 साक्षीदारांना हजर करण्यात आलं. संपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने 14 ऑगस्टला आरोपींना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावली. 

कोतवाली शहरात ही घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, 20 डिसेंबर 209 रोजी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीत सांगितलं होतं त्यानुसार, पीडित महिला शेतात काम करत होती. यावेळी गावातच राहणारे अमर राजपूत आणि पप्पू उर्फ भगवानदास तिथे आले. दोघांनीही तिला बंदुकीचा धाक दाखवला आणि फरफटत जवळच्या झोपडीत नेलं. तिथे त्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. 

बलात्कार केल्यानंतर मंगळसूत्र आणि कानातले लंपास केले

सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडितेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील लंपास केले. इतकंच नाही तर जाताना पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. महिलेने घरी पोहोचल्यानंतर आपल्या नातेवाईकांना सगळा प्रकार सांगितला. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिलेच्या नात्यात असून तिचा भाचा लागतो. याआधीही मार्च महिन्यात याच आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला होता. 

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक शोषण

आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओही रेकॉर्ड केला होता. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ते सतत तिचं लैंगिक शोषण करत होते. यानंतर आरोपींनी सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी 16 नोव्हेंबरला कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. सुनावणीदरम्यान, एकूण 7 साक्षीदार हजर करण्यात आले. यादरम्यान 4 न्यायाधीश बदलले, 65 हून अधिक तारखा मिळाल्या. 

कोर्टात 7 साक्षीदार हजर करण्यात आले – वकील कमल सिंह

याप्रकरणी सरकारी वकील कमल सिंह गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 पासून या प्रकरणाला सुरुवात झाली होती. दोन्ही आरोपींनी महिलेवर पाशवी अत्याचार केले. तसंच त्याचा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत सतत लैंगिक शोषण करत राहिले. यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर महिलेने आपल्या घरी याची माहिती दिली. मग एपआयआर दाखल झाला. कोर्टात आम्ही 7 साक्षीदार हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दोन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. कोर्टाने दोघांनाही 20-20 वर्षांची शिक्षा सुनावली असून, 50-50 हजारांचा दंड ठोठावला आहे. 

Related posts