[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) अधिक चांगले आणि निरोगी आरोग्य मिळवून देण्यासाठी आपण वेगवेगळ्या अन्नाचे सेवन करत असतो. यासाठी विटामिन्स, पोषक तत्वांनी युक्त अशा भाज्या, ताजी फळं, ड्रायफ्रूट्स इत्यादीचे सेवनही केले जाते. सतत बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचाही तरूण पिढीलाही सामना करावा लागतो. तरूण वयातच हाडं ठिसूळ व्हायला लागली असतील तर २०६ हाडांच्या मजबूतीसाठी तुम्ही एका रामबाण घरगुती उपचाराचा तुम्ही आधार घेऊ शकता. शरीर अधिक तंदुरूस्त होण्यासाठी दुधात हळद मिक्स करून पिण्याचे फायदे तर तुम्हाला माहीत आहेतच. पण याप्रमाणेच दुधात तूप मिक्स करून शरीराला अनेक फायदे मिळतात. WebMD ने दिलेल्या अहवालानुसार, दुधात तूप मिक्स करून नियमित प्यायल्यामुळे हाडांची मजबूतीसह अनेक फायदे मिळतात. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]