( प्रगत भारत । pragatbharat.com)
लग्नानंतर एका नववधूने दुसऱ्या दिवशीच आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट लिहत आपण पतीला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच यामागील कारणंही उलगडलं आहे. आपण पतीला चेतावणी दिलेली असतानाही त्याने असं काही केलं की मला हा निर्णय घ्यावा लागला असं तरुणीने सांगितलं आहे. एका कॉलममध्ये महिलेने नाव जाहीर न करता आपला हा अनुभव शेअर केला आहे. यामध्ये तिने लवकरच आपलं लग्न होणार असल्याचं म्हटलं आहे.
“आमच्यात कोणताही वाद नव्हता”
तरुणीने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला खरं तर या लग्नात कोणताही रस नव्हता. पण जेव्हा तिच्या प्रियकराने 2020 मध्ये तिला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा तिने होकार दिला होता. यानंतर दोघांनीही लग्नाची तयारी सुरु केली होती. दोघांनीही जबाबदारी वाटून घेतल्या असल्याने त्यांच्यात कोणताही वाद नव्हता.
“अशी चूक करेल असं वाटलं नव्हतं”
तरुणीने सांगितलं की, माझी फक्त एकच अट होती की लग्नाच्या दिवशी कोणीही आणि खासकरुन पतीने चेहऱ्यावर केक लावू नये. तो मला चांगला ओळखत असल्याने अशी चूक करणार नाही याची खात्री होती. पण त्याने लग्नात माझी मस्करी केली. त्याने लग्नाच्या दिवशी माझी मान पकडली आणि चेहऱ्यावर केक फासला.
“प्रँकसाठी केली होती पूर्ण तयारी”
तरुणीने सांगितलं आहे की, इतकं समजावल्यानंतरही पतीने सर्व तयारी केली होती. याचं कारण त्याच्याकडे आधीपासूनच दुसरा केक तयार होता. त्यामुळे मला हे अजिबात आवडलं नाही. मी त्याला दुसऱ्या दिवशीच आता हे फार झालं, हा लग्नाचा शेवट आहे असं सांगितलं. मी माझ्या पतीला माफ करावं आणि दुसरी संधी द्यावी असं माझ्या कुटुंबाचं म्हणणं आहे. मी जरा जास्तच व्यक्त होत आहे असं त्यांना वाटत आहे.
पुढे तिने म्हटलं आहे की, “माझ्या पतीने हे समजून घेतलं पाहिजे की, अपघातानंतर मी claustrophobic झाली असून गोष्टींना घाबरत आहे”. महिलेने लोकांना आपण पतीला माफ करावं का अशी विचारणा केली आहे. दरम्यान, या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट क्लाय आहेत.
एकाने म्हटलं आहे की, तुमचं नात सुरु होण्याआधीच मिळालेली ही चेतावणी आहे, तुम्ही लवकरच वेगळं झालं पाहिजे. तर एकाने इतक्या छोट्या मुद्द्यावर नातं तोडू नका असा सल्ला दिला आहे. एकाने इतक्या छोट्या गोष्टीवर कोणी आपल्या जोडीदाराला सोडतं का असं विचारलं आहे.