महिलेचा दफनविधी झाला, ११ दिवसानंतर कबरीतून येऊ लागले काळीज चिरणारे आवाज, भयानक सत्य समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Woman Buried Alive: एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्या धर्माच्या धार्मिक मान्यतांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाते. हिंदू धर्मानुसार मृतदेहाला अग्नी दिला जातो तर ख्रिश्चन धर्मानुसार दफनविधी केला जातो. एखाद्या व्यक्तीला दफन केल्यानंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मशानभूमीत थडगे बांधले जाते. अलीकडेच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. रोसांगेला अल्मेडा हिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला होता. त्यानंतर सिमेंटने पूर्णपणे त्यावर बांधकामही करण्यात आले होते. महिलेला दफन करुन 11 दिवस उलटले होते. मात्र, या दरम्यान दररोज स्मशानभूमीत किंचाळण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येत होते. परिसरातील लोकांनी महिलेच्या कुटुंबीयांना कळवताच त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. 

रोज स्मशानभूमीतून येणारे आवाज ऐकल्यानंतर स्मशानभूमीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी याचा शोध घ्यायाचे ठरवले. तेव्हा ते स्माशानभूमीत जाऊन त्यांनी प्रत्येक थडग्याची पाहणी केली. त्यावेळेस त्यांना रोसांगेला अल्मेडा हिच्या थडग्याजवळ संशयास्पद आढळले. त्यांनी तात्काळ तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.  त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रोसांगेलाची कबर फोडल्यानंतर ती मृतावस्थेतच आढळली. मात्र, तिच्या मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. रोसांगेला अल्मेडा हिला तिच्या कुटुंबीयांनी जिवंतपणीच दफन केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

रोसांगेला अल्मेडा 11 दिवस त्या कबरीत बेशुद्धावस्थेत पडून होती. त्यानंतर तिने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तिथून बाहेर पडण्यासाठी तिने खूप आरडाओरडा करुन मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर थडग्याला हाताने मारुन फोडण्याचाही प्रयत्न केला. या संघर्षात तिच्या हाताला गंभीर इजा झाली. ज्या वेळेस तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा कबरीत रक्त सापडले होते. या प्रकरणी एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. 

व्हिडिओत दिसत आहे की, महिलेला थडग्यातून बाहेर काढण्यात येत आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिकेलाही बोलवण्यात येत आहे. तर काही लोक तिच्या पायांना स्पर्श करत आहेत. जेव्हा लोक तिच्या पायांना स्पर्श करताना म्हणत होते की, तिचे पाय गरम होते. त्यामुळं तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला तिथेच दफन करण्यात आले.

स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या लोकांनी रोझॅन्जेलाला दफन केल्यानंतर 11 दिवसांनी थडग्याच्या आतून ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. महिलेच्या हातावर आणि कपाळावर जखमा होत्या, ज्यामुळे तिने कबरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत होते. महिलेच्या कानात व नाकातील कापूसही तिच्या अंगातून बाहेर पडला होता.

Related posts