Shocking : कित्येक वर्ष समुद्रात तरंगत होती बॉटल; आतली चिठ्ठी वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sea beach bottle Message : आयुष्यात कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. कधी कोणाचं नशिब चमकेल सांगू शकत नाही. अनेकदा जुन्या पुरातन गोष्टींचा संबंध आपल्या आयुष्यात सुसंगत असल्याचं जाणवतं. मात्र, त्यामागील लॉजिक मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही. एखाद्या गोष्टीवरील दृढविश्वास ठेवला की काम होतं, असं वडिलधारे आपल्याला सात्त्याने सांगत असतात. याचीच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. ही घटना घडलीये. आयर्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर…

समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छतेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अतरंगी गोष्टी सापडत असल्याचं पहायला मिळतं. लांब लांबहून कचरा समुद्रकिनाऱ्यावर तरंगत येतो. कधी कोणाच्या खास वस्तू मिळतात तर कधी कोणाचे गुप्त संदेश. अशातच न्यू जर्सीच्या एका कुटुंबाला देखील असंच काहीसं पहायला मिळालं. बीचवर कचरा साफ करणाऱ्या एका कुटुंबाला एका बाटलीत संदेश सापडला. फ्रँक बोलगर, त्यांची पत्नी कॅरेन आणि नात ऑटम वाइल्डवुडमधील स्ट्रीट बीचची साफसफाई करत असताना त्यांना आत कागदाचा तुकडा असलेली बाटली सापडली. त्या बॉटलमध्ये खास संदेश लिहिण्यात आला होता.

बोल्गर म्हणतो, आम्हाला ती बाटली पाण्याच्या काठावर समुद्राच्या वाळूत पुरलेली आढळली. बाटली इतकी घट्ट पॅक कशामुळे झाली हे शोधण्यासाठी आम्हाला ती घरी घेऊन जावं लागलं. 17 जुलै 2019 या तारखेला ही चिठ्ठी लिहिण्यात आली होती.

चिठ्ठीत काय लिहिलं होतं?

आयर्लंडकडून शुभेच्छा. कोणीतरी शोधण्यासाठी मी ही बाटली समुद्रात फेकून दिली. ती आफ्रिकेत किंवा आइसलँडला गेली असावी! कोणाला ती सापडली की नाही हे मला माहीत नाही. पण मला आशा आहे की ती सापडेल, असा संदेश या बॉटलमधील चिठ्ठीत लिहिण्यात आला होता.

पाहा पोस्ट

दरम्यान, बोल्गर यांनी द वाइल्डवुड सन यांच्यासोबत शेअर केली. त्यानंतर सन यांनी फेसबूक पोस्ट करत याची माहिती दिली. त्यानंतर आता चिठ्ठी कोणी लिहिली होती. याचा शोध घेतला जात आहे. सध्या सोशल मीडियावर मात्र ही पोस्ट तुफान व्हायरल होत असल्याचं देखील पहायला मिळत आहे.

Related posts