( प्रगत भारत । pragatbharat.com)
Train Ticket Discount: भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. यात अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या ७ हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. त्याचबरोबर, भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य लोक रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि स्वस्त मानतात. तसंच, रेल्वे प्रशासनाकडूनही काही प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटांत सूट दिली जाते. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरांत सूट दिली जाते. त्या व्यतिरिक्त आणखी काही प्रवाशांना तिकिट दरांत सूट मिळत आहे. जाणून घेऊया किती आणि कोणत्या प्रवाशांना सूट मिळते.
झी बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वेकडून दिव्यांग, नेत्रहिन आणि मानसिक अवस्था ठिक नसलेल्या प्रवाशांना ट्रेनच्या तिकिटांत 75 टक्के सूट मिळू शकते. या प्रवाशांना जनरल क्लास ते स्लीपर क्लास आणि थर्ड एसीच्या तिकिटांत सवलत मिळते. जवळपास 75 टक्के सूट या प्रवाशांना मिळते.
त्याचबरोबर हे प्रवासी एसी फर्स्ट क्लास किंवा सेकेंड क्लासचे तिकिट काढतात तर त्यांना त्या तिकिटांवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळते. तर, राजधानी व शताब्दी सारख्या ट्रेनमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुकबधिरांना ट्रेनमध्ये 50 टक्के सवलतीचा लाभ मिळतो. याशिवाय, अशा व्यक्तींसोबत प्रवास करणाऱ्यांना सहप्रवासालाही तिकिटांवर समान सवलतीचा लाभ मिळतो.
या प्रवाशांनाही मिळते सूट
याशिवाय विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तिकिटांमध्ये सवलतीचा लाभ देते. कॅन्सर, थॅलेसेमिया, हृदयविकाराने त्रस्त असलेल्या, किडणीचे रुग्ण, हिमोफिलियाचे रुग्ण, टीबीचे रुग्ण, एड्सचे रुग्ण, ऑस्टोमीचे रुग्ण, अॅनिमिया, ऍप्लास्टिक अॅनिमिया, या सारख्या रुग्णांना तिकिट दरांत सूट मिळते.
ज्येष्ठ नागरिकांनाही मिळते सूट
भारतीय रेल्वे सीनिअर सिटीझन्सना अनेक सुविधा आणि सवलती देतात. रेल्वेच्या नियमांनुसार पुरुषांचे वय 60 वर्षे आणि महिलांचे वय 58 वर्ष पूर्ण असल्यास त्यांना जेष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा मिळू शकतात. रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ अलॉट करतात. या प्रमाणेच एखाद्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलेलादेखील ऑटोमॅटिक पद्धतीने लोअर बर्थ दिले जाते. एसी 3 टायर, एसी 2 टायर बोगीत वृद्ध नागरिकांसाठी तीन लोअर बर्थदेखील सिनीअर सिटीजन्ससाठी राखीव असतात. हे बर्थ 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना व गरोदर महिलांसाठी राखीव ठेवतात.