पुण्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या इतर शहरातील इंधनाचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Petrol Diesel Rate on 27 August 2023 : देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel Price) नवीन दर जाहीर केले आहेत. गेल्या 468 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा मोठा बदल झाला होता.तेव्हापासून देशात इंधनाचे भाव कमी झाले नाहीत किंवा वाढले नाहीत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या (Crude Oil) किमतीमध्ये वाढ झालेली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.99 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ते प्रति बॅरल 79.83 डॉलरला विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 1.34 टक्क्यांनी वाढल्याने ते प्रति बॅरल 84.48 डॉलरला विकले जात आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी 27 ऑगस्ट रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील विविध शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर सारखेच आहेत.

मात्र पुणेकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. पुण्यात पेट्रोल 39 पैशांनी स्वस्त होऊन 105.91 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर डिझेल 38 पैशांनी स्वस्त होऊन ते 92.43 रुपये दराने विकले जात आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विक्री केले जात आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मार्च 2022 पासून क्रूडच्या किमती सुमारे 55 डॉलर प्रति बॅरलने घसरल्या आहेत. मार्च 2022 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रूडच्या किमती प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचल्या होत्या. कच्च्या तेलाच्या दरात घसरण होऊनही आजही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. बिहार, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, सिक्कीम, झारखंड, कर्नाटक, पंजाब, मणिपूर, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे आहे.

Related posts