Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crocodile Viral Video : धाडस, शौर्य आणि मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे. पण हे अनेक लोकांना कळत नाही. त्यांचा मूर्खपणा, अतिशहान शहानपणा त्यांना कधी कुठे कसा नडतो हे त्यांच माहिती नसतं. यांच्या या मूर्खपणामुळे ते आपला जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (Man puts hand inside crocodiles mouth what happens next video viral on Internet today Trending news )

वाघ, सिंह, बिबट्या असो किंवा मगर या प्राणघातक आणि भीतीदायक प्राण्यांशी कोणही शहाणा माणूस पंगा घेत नाही. पण या व्हिडीओमधील व्यक्तीने त्याच्या मूर्खपणामुळे एका मोठ्या संकटांला आमंत्रण दिलं. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन महाकाय मगरी आहेत. त्या मगरीसोबत दोन व्यक्ती देखील आहे. एक व्यक्ती मगरीपासून दूर आहे. तर दुसरा मगरीजवळ आहे. काळा रंगाचे कपडे घातलेल्या व्यक्तीने महाकाय मगरीच्या तोंडात खोलवर हात घातला आणि मग…

अन् हे काय मगरीने आपला जबडा बंद केला. तो व्यक्ती वेदने आणि भीतीने ओरड होता. हे पाहून दुसरा लाल रंगाचे कपडे घातलेला व्यक्ती पाण्यात उतरला. मगर त्या व्यक्तीचा हात जबड्यात घट्ट धरुन इकडे तिकडे फिरु लागली. कदाचित ती तो हात धडापासून वेगळा करण्यासाठी हालचाल करत असेल. 

पण नशीब आणि त्या व्यक्तीचा हात मगरीच्या जबड्यातून निसटला आणि तो व्यक्ती लगेचच तिथून निघून गेला. त्यानंतर लाल रंगाचे कपडे घातलेला व्यक्तीने मोठ्या मेहनतीने त्या दोन मगरीवर जोरजोरात पाणी जमिनीवर पडलेले रक्ताचे थारोळे धुतले. किंबहुना तो व्यक्ती त्या मगरीवर पाण्याचा मारा करुन त्यांना मागच्या बाजूला रेटायचा प्रयत्न करत असावा. 

हा व्हिडीओ कुठला आहे, शिवाय कधीचा याबद्दल काही माहिती नाही. पण हा व्हिडीओ जपानमधील एखाद्या प्राणीसंग्रहालयातील असेल असं पाहून वाटतं. 

हा व्हिडीओ ट्वीटर म्हणजे X वरील CCTV IDIOTS या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज तर मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळालंय.

शिवाय युजर्सनीही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पुन्हा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. 

Related posts