आजोबांनी आपला ‘तो’ फोटो जपून ठेवलाय तरी आजी नाराज! नेटकरी म्हणाले, ‘स्त्रियांना पुरुषांचे प्रेम कधीच कळत नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aji Ajoba Love Story Video: आजकालचा जमाना हा डिजिटल रिलेशनशिप्सचा आहे. परंतु जेव्हा हा डिजिटलचा जमाना नव्हता तेव्हा मात्र प्रेमाची परिभाषाचं ही वेगळी होती. डोळ्यातलं प्रेम, पत्रातून लिहिलेल्या भावना, नात्यातला आगळा गोडवा इत्यादी. आता मात्र डेटिंग अॅप्स, चॅटिंग, पॉर्न अशा अनेक गोष्टींमुळे नाती आणि प्रेम यांच्या परिभाषा कैक पुढे गेल्या आहेत. बदलल्या आहेत. परंतु जुन्या काळातील प्रेम हे आजच्या काळातही भक्कमपणे टिकून आहे आणि रूजलेलं आहे. आजही तरूणपिढीला यातून प्रेरणा मिळते आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच एका आजोबांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी आपल्या पत्नीचा फोटो त्या हयात असूनही त्यांच्या पाकिटामध्ये गेली 56 वर्षे जपून ठेवला आहे तरीसुद्धा आजी मात्र त्यावरही समाधानी नाहीत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. आपल्या पत्नी मात्र यावर काही खुश नाहीत त्यावर आजोबांनी मात्र त्यांना भन्नाट उत्तर दिलं आहे. चला तर मग जाणून घेऊया आजी-आजोबांची ही हटके लव्ह स्टोरी. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा खुर्चीवर बसले आहेत आणि आपल्या पाकिटातून ते आपल्या पत्नीचा तारूण्यातला फोटो बाहेर काढून दाखवत आहेत. या व्हिडीओत एक मुलगी प्रेक्षकांना सांगते की, ”माझ्या बाबाजवळ एक खास वस्तू आहे. बाबांजवळ हे पाकिट आहे त्यात बाबांनी त्यांच्या लग्नाच्या वेळीचा आईचा फोटो जपून ठेवला आहे.” आपल्या वडिलांना तो फोटो बाहेर काढताना पाहून ती विचारते की, ”बाबा हा फोटो किती जुना आहे?” त्यावर आजोबा म्हणतात की, ”1977 साली हा फोटो मला देण्यात आला होता. 46 वर्षांपासून हा फोटो माझ्या पाकिटात आहे”. 

ही मुलगी मग आपल्या आईकडे कॅमेरा करते आणि आपल्या आईलाही तो फोटो दाखवते तेव्हा त्या म्हणतात की, ”नुसता फोटो ठेवून काय फायदा?”. तेव्हा आजोबा म्हणतात की, ”यातच सर्व आलं..हे लक्षात ठेव”, त्यावर मुलगी हसत हसत म्हणते, ”तुम्ही भांडू नका.. तुम्ही भांडू नका”. sailee.godbole88 या अकांऊटवरून हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये कॅप्शनवर लिहिलंय की, ”कोणी प्रेम करावे तर तुमच्या सारखे करावे बाबा. तुम्ही खरंच हिरो आहात. तुमचा हा गोड स्वभाव… ही पिढी खरंच कमाल आहे!” (कोई प्यार करे,तो तुमसा करे… बाबा. you are a true Hero. Such a sweet gesture. ही पिढी खरंच कमाल आहे!)

नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर तुफान कमेंट्स केल्या आहेत. ”भांडण आहे ते ठीक आहे पण प्रेम किती भारी आहे. हे महत्त्वाचे आहे. 70 वर्षांपासून सांभाळून ठेवलाय. आता अजून काय हवं.” तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ”स्त्रियांना पुरुषांचे प्रेम कधीच कळत नाही”. 

Related posts