( प्रगत भारत । pragatbharat.com)
गुजरातच्या खेडा जिल्ह्यात एका सूनेनेच आपल्या सासऱ्याची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपास केला असता, यावेळी धक्कादायक खुलासे समोर आले. चौकशीदरम्यान, सासरा आणि सूनेत शारिरीक संबंध होते हे उघड झालं. घरातल्या एका खोलीत दोघं शारिरीक संबंध प्रस्थापित करत असत. या बदल्यात सासरा सूनेला पैसे देत होता. पण याच पैशांसाठी सूनेने सासऱ्याला ठार केलं. पोलीस चौकशीत याचा उलगडा झाला.
आरोपी सून फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाच्या संपर्कात आली होती. या तरुणाने तिला विदेशात नेण्याचं आश्वासन दिलं होतं. पण यासाठी 2 लाखांची गरज होती. विदेशात जाण्याच्या हव्यासापोटी सूनेने पैसे मिळावेत म्हणून अखेर सासऱ्याची निर्दयीपणे हत्या केली. सूनेने सासऱ्याचं गुप्तांगच कापून टाकलं. यानंतर पोलिसांनी सूनेला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास सुरु आहे.
खेडा जिल्ह्याच्या डाकोर येथील 75 वर्षीय जगदीश शर्मा तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. कुटुंबाने सर्व ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा काही पत्ता लागत नव्हता. मोठा मुलगा विजयभाई शर्मा याच्यासह काही लोक चोल येथील घरी पोहोचले असता, तिथे टाळं होतं. यानंतर त्यांनी टाळं तोडून पाहिलं असता, जगदीश शर्मा यांचा मृतदेह नग्न अवस्थेत पडलेला होता. नंतर लगेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता डोकं आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं. दुसरीकडे तक्रारदार मुलाने आपल्या छोट्या भावाच्या पत्नी मनिषा शर्मावर संशय असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मनिषा शर्माची चौकशी केली. कसून चौकशी केली असता तिने सांगितलेले घटनाक्रम ऐकून सगळेच चक्रावले.
पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबूल करताना सून मनिषा शर्माने सांगितलं की, आपण नेहमीच सासऱ्याशी शारिरीक संबंध ठेवत होते. याबदल्यात सासरे माझी आर्थिक मदत करत होते. पण जवळपास एक महिन्यापूर्वी मनिषाची फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाशी ओळख दिली होती. या मित्राने तिला विदेशात नेण्याचं आश्वासन दिलं. यानंतर मनिषा विदेशात जाण्याची स्वप्नं पाहू लागली.
पण विदेशात जाण्यासाठी मनिषाला 2 लाखांची गरज होती. यासाठी तिने सासऱ्यांकडे 2 लाख मागितले असता, त्यांनी नकार दिला. सासऱ्यांनी नकार दिला असता मनिषाने त्यांच्या हत्येचा कट आखला.
मनिषा सासऱ्यांसह चोल येथील घरी गेली. तिथे शारिरीक संबंध प्रस्थापित करत असतानाच तिने सासऱ्याच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केला. इतकंच नाही, तर शांत डोक्याने सासऱ्याला ठार केलं. यानंतर घराला टाळं लावून ती निघून गेली. सासऱ्याची हत्या केल्यानंतर काहीच झालं नाही अशा आवेशात ती पुन्हा आपल्या सासरी जाऊन राहू लागली.
दुसरीकडे तीन दिवस झाले तरी जगदीश शर्मा घऱी न आल्याने त्यांचं कुटुंब चिंतेत होतं. कुटुंब त्यांचा शोध घेत असताना मनिषाही त्यांच्यात सहभागी झाली होती. अखेर चोल येथील घरात त्यांचा मृतदेह आढळला आणि सगळा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी सून मनिषा शर्माला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.