बँकेत FD करणाऱ्यांची मजाच मजा; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IDBI Bank Special FD: दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि ठेवी या साऱ्यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे बँक. बँकेतील अनेक योजना, व्याजदरात मिळणाऱ्या सवलती आणि खातेदार म्हणून मिळणारे फायदे या न त्या कारणानं तुमच्याच फायद्याचे असतात. अशा या बँकेत एफडी करणाऱ्यांची अर्थात फिक्ड्स्ड डिपॉझिटला पैसे ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तुम्हीही यातलेच एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची. 

बँकेतील एफडीवर तुम्हालाही जास्तीच्या व्याजाची अपेक्षा आहे? तर, IDBI Bank त्यांच्या स्पेशल फिक्सड डिपॉजिट स्कीम (special fixed deposit) अंतर्गत ही संधी देत असून त्यांनी आता त्यासाठीची मुदतही वाढवली आहे. IDBI Bank कडून ग्राहकांना 375 आणि 444 दिवसांसाठीच्या एफडीला आता अमृत महोत्सव एफडी असं नाव देण्यात आलं असून एक नवी योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती पण, आता मात्र तुमच्या हाताशी आणखी काही दिवस असणार आहेत. परिणामी एफडीवर मिळणाऱ्या व्याजाचा फायदा आता तुम्हाला 31 ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.

व्याजदर किती? 

बँकेच्या माहितीनुसार नियमित, NRE आणि NRO ग्राहकांना 444 दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी स्कीमवर 7.15 टक्के दरानं व्याजाचा फायदा मिळणार आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत 7.65 टक्के इतकं व्याज मिळेल. शिवाय वेळेआधी तुम्हाला एफडीतून पैसे काढायचे झाल्यास किंवा ती मोडायची झाल्यासही या सुविधा बँक पुरवणार आहे. त्यामुळं निश्चिंत होऊन या पर्यायाचा विचार तुम्ही करु शकता.

375 दिवसांसाठीच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.10 टक्के दरानं व्याज मिळतं. तर, ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी 7.60 टक्के इतकं व्याज मिळतं. बँकेकडून इतर एफडीवर मिळणाऱ्या व्याजदराची आकडेवारीही पाहूनच घ्या… 

07-30 दिवस – 3%

31-45 दिवस –  3.25%

46- 90 दिवस –  4%

91-6 महीने –  4.5%

6 महीने 1 दिवस ते 270 दिवस – 5.75%

71 दिवसांपासून < 1 वर्ष – 6.25%

1 वर्ष ते 2 वर्ष –  6.8%

वरील आकडेवारी पाहता आयडीबीआय बँकेनं त्यांच्या व्याजदरांमध्ये बदल केले असून, 15 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळं आपल्या सोयीनुसार तुम्हीही इथं एफडीला प्राधान्य देऊ शकता. 

Related posts