सोन्यानं बनलेल्या ‘या’ ग्रहावर सर्वात आधी जाणार NASA, तारीख ठरली!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet :  700,000,000,000,000,000,000 आकडा मोजातानाही बोबडी वळतेय ना? संशोधकांना अवकाशात एक असा ग्रह सापडला आहे जिथे पृथ्वीपेक्षा जास्त सोनं आहे. या सर्व सोन्याची किंमत अंदाजे 700 क्विंटिलियन डॉलर्स म्हणजेच 700,000,000,000,000,000,000 डॉलर्स इतकी आहे. सोन्यानं बनलेल्या ‘या’ ग्रहावर सर्वात आधी अमेरिकेची अंतराळ संस्‍था अर्थात  NASA जाणार आहे. सोन्यानं बनलेल्या या ग्रहावर जाम्यासाठी नासाने खास मिशन हाती घेतले आहे. या मिशनची तारीख देखील जाहीर झाली आहे. 

या ग्रहावरील सोनं पृथ्वीवर आले तर प्रत्येक व्यक्ती होईल अब्जाधीश

सध्या जगभरातील संशोधक परग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. यासाठी  विविध ग्रहांचा अभ्यास केला जात आहे.   संशोधनादरम्यान संशोधकांना हा लघुग्रह आढळला आहे. 16Psyche Gold Planet असे या ग्रहाचे नाव ठेवण्यात आले आहे.    हा ग्रह सूर्यमालेतच असून तो सूर्याभोवती फिरत आहे.  हा लघु ग्रह सूर्याभोवती मंगळ आणि गुरू यांच्या कक्षेमध्ये फिरतो. सर्व प्रथम 17 मार्च 1852 रोजी इटालियन खगोलशास्त्रज्ञ एनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी या ग्रहाचा शोध लावला. जवळपास सर्वच लघुग्रह खडक, बर्फ किंवा या दोघांच्या मिश्रणाने बनलेले असतात. मात्र,या लघुग्रहावर मोठ्या प्रमाणात धातूचा साठा आढळला आहे. या ग्रहावर प्लॅटिनम, सोने आणि इतर धातू मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा केला जात आहे. हे सर्व सोने पृथ्वीवर आले तर प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होऊ शकते असा दावा केला जात आहे. निरीक्षणादरम्यान या ग्रहावर मोठ्या प्रमाणात सोनं आढळून आले आहे. यामुळेच याला  Gold Planet असेही म्हंटले जात आहे.  या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासा एक विशेष मोहिम राबवणार आहे.

सोन्यानं बनलेल्या ग्रहावर पोहचण्यासाठी नासाचे Psyche Mission

सोन्यानं बनलेल्या ग्रहावर पोहचण्यासाठी नासाने एक मिशन हाती घेतले आहे. Psyche Mission असे नासाच्या या मोहिमेचे नाव आहे. Psyche Mission अंतर्गत नासा या ग्रहावर एक अंतराळयान अर्थात स्पेसक्राफ्ट पाठवणार आहे. Psyche spacecraft असे याचे नाव आहे. नासाच्या सायकी अॅस्टेरॉइड एक्सप्लोरर मिशनला अमेरिकन सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी नासा Psyche spacecraft लाँच करणार आहे. ऑगस्ट 2029 मध्ये Psyche spacecraft  या सोन्याच्या लघुग्रहावर पोहचणार आहे.  नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) मधून या अवकाशयानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. 16Psyche Gold Planet आपल्या सूर्याभोवती पाच वर्षांत  एक परिक्रमा करतो. त्याचा एक दिवस 4.196 तासांचा असतो. या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या चंद्राच्या वजनाच्या फक्त 1 टक्के आहे. नासाचे  Psyche spacecraft मॅग्नेटोमीटर वापरून या ग्रहाच्या चुंबकीय शक्तीचे मोजमाप करणार आहे. 

Related posts