( प्रगत भारत । pragatbharat.com)
Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा संघर्ष आता इतक्या विकोपास गेला आहे की जगभरातील देशांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या संघर्षामध्ये जवळपास 1200 हून अधिक बळी गेले आहेत. शनिवारीच हमासनं 5000 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि युद्धाची ही ठिणगी वणवा होऊन जगासमोर आली. या संघर्षाचे परिणाम आता जागतिक तेल विक्रीवर होताना दिसणार आहेत.
किंबहुना तिथं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाची हाक दिलेली असतानाच इथं कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 856 डॉलर प्रती बॅरलनं वाढला. तर, ब्रेंट क्रूडही 87 डॉलरनं वाढलं. भारतात मात्र 511 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल या इंधनाच्या दरांमध्ये तुलनेनं दिलासा पाहायला मिळाला.
कंपन्यांनी जाहीर केले नवे दर
तेस उत्पादन कंपन्यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. जिथं इंडियन ऑईलकडून पेट्रोल (दिल्ली) 96.72 रुपये लीटर आणि डिझेल 89.62 रुपये लीटर इतक्या दरानं विकलं जात असल्याचं सांगण्यात आलं.
तज्ज्ञांच्या मते इस्रायल हमास यांच्यातील संघर्ष पश्चिम आशियापर्यंत पोहोचल्यास त्याचे परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होणार असून, मोठं आव्हान उभं राहू शकतं. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ झाल्यास भारतातही इंधन दरवाढ नाकारता येत नाही.