इस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ISRO Job News : सरकारी खात्यात (Govt Jobs) नोकरीसाठी प्रयत्न करणारी एक मोठा वर्ग आपल्या देशात आगे. खासगी क्षेत्रात नोकरी असतानाची सुट्ट्या, भत्ते, सुविधा या आणि अशा अनेक कारणांसाठी ही मंडळी सरकारी खात्यात नोकरीच्या शोधात असतात. त्यातची मागील काही काळापासून ठराविक सरकारी संस्थांमध्ये नोकरी करण्याचा मोह अनेकांनाच आवरेना असं एकंदर चित्र पाहायला मिळालं. पण, असं वाटणं आणि प्रत्यक्षात नोकरीची संधी मिळणं यात फरक आहे. नोकरीसंदर्भातील (Jobs) हे एकंदर चित्र आणि उपलब्ध असणाऱ्या संधी यांचं वास्तव खुद्द इस्रो प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनीच एका मुलाखतीदरम्यान समोर आणलं. 

इस्रोला नवखे, निष्णात इंजिनिअर्स मिळेना 

इस्रो अर्थात भारतीयअंतराळ संशोधन संस्थेमध्ये नोकरीच्या जागा रिक्त असून सध्या तिथं नोकरभरतीसाठीची मोहिमही सुरु आहे पण, देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थांपैकी एक असणाऱ्या IIT मधील विद्यार्थी/ इंजिनिअर्सनी इस्रोकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे. सोमनाथ यांनीच ही खंत व्यक्त केली. 

अवकाश क्षेत्र देशाच्याही दृष्टीनं महत्वाचं आहे अशी फक्त 1 टक्का किंवा त्याहून कमी मुलं या नोकरीच्या संधीचा विचार करतात. बाकीचे मात्र दुरून डोंगर साजरे म्हणज या संधीचा विचारही करत नाहीत आणि यामागचं कारण आहे इस्रोमधून देण्यात येणारा पगार. 

पगाराची माहिती देताच मिळालेली अशी प्रतिक्रिया… 

एस सोमनाथ यांनी त्यांचा एक अनुभव वृत्तसमुहाशी शेअर केला, जिथं ते म्हणाले ‘ते (इस्रोची टीम) करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती देत होते. करिअरच्या संधी आणि कामाची पद्धत या साऱ्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी पगाराच्या रचनेचाही उल्लेख केला. विद्यार्थ्यांना इथं तगड्या पगाराची अपेक्षा होती. अखेर प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर जवळपास 60 टक्के इच्छुकांनी तिथून काढता पाय घेतला.’

आयआयटीमधून उत्तीर्ण होणारे किंवा शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी Campus Interview मधून इतका पगार मिळवतात जितका इस्रोमध्ये एखाद्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याला मिळतो, अशी प्रत्यक्ष परिस्थितीही त्यांनी सर्वांसमोर आणली. 

 

किंबहुना काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक हर्ष गोएंका यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्रोचे प्रमुख आणि अवकाश विभागाचे सचिव असणाऱ्या सोमनाथ यांना 2.50 लाख रुपये इतका पगार मिळत असल्याचं सांगितलं. इतका पगार आयआयटीमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट पॅकेज म्हणून दिला जातो. उलटपक्षी इस्रोमध्ये निर्धारित वेतनश्रेणीनुसार इंनिनिअर्सना 56100 रुपयांपासून पुढे वेतन सुरु होतं. त्यामुळं ही विचार करण्याजोगी बाब आहे. जिथं देशात इतर गोष्टींवर इतका खर्च करण्याचा प्राधान्य दिलं जात आहे तिथंच नामवंत संस्थांमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या किंवा इथं येणाऱ्या नव्या पिढीला इतका कमी पगार का? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. 

Related posts