… तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Job News: एखाद्या खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या की, अनेकांचेच डोळे चमकतात. या न त्या सुट्ट्या, वीकेंडला कामाचा कमी ताण, कमालीचं प्रोफेशनल कल्चर अशा अनेक गोष्टी खासगी नोकरीमध्ये पाहायला मिळतात. पण, अशाच या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली असून, त्यांना एका क्षुल्लक गोष्टीमुळं चक्क मॅनेजरच नोकरीवरून काढू शकतो. कंपनीतील उच्चस्तरिय बैठकीमध्येच यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून आता त्याचा फटला अनेकांना बसू शकतो. 

कोणत्या कंपनीनं घेतला हा निर्णय? 

खासगी क्षेत्रातील आणि MNC पैकी एक असणाऱ्या Amazon नं नुकतंच कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला असून, आठवड्यातून तीन वेळा ऑफिसला न येणाऱ्या कर्मचाना नोकरीवरून काढण्याचे अधिकार मॅनेजरना देण्यात आले आहेत. 

गेल्या आठवड्यातच अंतर्गत कार्यप्रणालीच्या माध्यमातून मॅनेजरना कंपनीकडून याबाबतची माहिती देण्यात आली. जिथं अॅमेझॉनकडून कर्मचाऱ्यांनी किमान तीन वेळा ऑफिसमध्ये येऊन काम करणं अपेक्षित असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ज्या धर्तीवर मॅनेजरच्या हाती इतका मोठा निर्णय़ देण्याची अॅमेझॉनची ही पहिलीच वेळ. 

कर्मचाऱ्यांना ताकिद देण्याची प्रक्रिया कशी असेल?

पहिल्या टप्प्यामध्ये मॅनेजरनं ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मिटींगमधून संवाद साधणं अपेक्षित असेल. फॉलोअप मेलमध्ये हे संभाषण व्हावं. तरीही कर्मचाऱ्यांनी नोकरीवर येण्यास नकार दिल्यास मॅनेजरनं ‘कारणे दाखवा’ तत्त्वावर आणखी एक मिटींग आखावी. 

मॅनेजरसोबतच्या मिटिंगही अपयशी ठरल्यास त्यानंतर या प्रकणामध्ये human resources representative ची मदत घेण्याची विचारणा करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांना लेखी इशारा (मेमो) किंवा इतर कोणत्याही पर्यायी मार्गानं नोकरीवरून काढण्याचा अंतिम इशारा दिला जाऊ शकतो. 

कोरोना काळानंतर अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना हायब्रिड पद्धतीनं नोकरीवर पुन्हा रुजू होण्यास सांगिललं होतं. तर, काही कंपन्यांनी पूर्ण आठवड्याभरासाठीच कर्मचाऱ्यांना नोकरीवर रुजू होण्याची विचारणा केली होती. त्याच धर्तीवर आता प्रत्येक कंपनी कमीजास्त प्रमाणात हे नियम लागू करताना दिसत आहे. अॅमेझॉनकडूनही काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणारी वर्क फ्रॉम होम सुविधा टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.

Related posts