( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kojagiri or Sharad Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी म्हणून ओळखलं जातं. तब्बल 9 वर्षांनी शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रगहण आहे. संपूर्ण वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चंद्रग्रहणाची सावली असताना कोजागिरी पौर्णिमेची पूजा करता येईल का? (Kojagiri Poornima or Sharad Purnima 7 auspicious yogas along with lunar eclipse laxmi puja muhurat vidhi mantra significance and moonrise timings and Kojagiri puja marathi video)
कोजागिरी पौर्णिमा 2023 तिथी
पौर्णिमा तिथी सुरु – 28 ऑक्टोबर पहाटे 4:17 वाजता
पौर्णिमा तिथी समाप्त – 29 ऑक्टोबर दुपारी 1.53 वाजता
उदय तिथीनुसार – 28 ऑक्टोबरला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाणार
स्नान आणि दान करण्याची वेळ – 28 ऑक्टोबरला पहाटे 4:47 ते सकाळी 5.39 वाजेपर्यत
सत्यनारायण पूजेची वेळ – सकाळी 7.54 ते सकाळी 9.17
कोजागिरी पौर्णिमा 2023 चंद्रोदयाची वेळ
कोजागिरी चंद्रोदयाची वेळ – संध्याकाळी 5.20 वाजता
कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजेचा मुहूर्त
कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी यंदा 3 मुहूर्त आहेत.
पहिला मुहूर्त – रात्री 8:52 ते 10:29 पर्यंत
दुसरा मुहूर्त – रात्री 10:29 पासून ते 12:05 पर्यंत
तिसरा मुहूर्त – रात्री 12:05 पासून ते 1:41 पर्यंत आहे.
कोजागिरी किंवा शरद पौर्णिमेला शुभ योग
कोजागिरी किंवा शरद पौर्णिमेला बुधादित्य योग, त्रिग्रही योग, गजकेसरी योग, षष्ठ योग, रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा संयोग आहे.
कोजागिरी लक्ष्मी पूजा विधी
घरातील मंदिर स्वच्छ करुन देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाच्या पूजेची तयारी करावी. त्यानंतर पाटावर लाल पिवळं कापड परिधान करा. त्यावर देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाची मूर्ती स्थापित करा. देवासमोर तूपाचा दिवा लावून गंगाजल शिंपडा आणि अक्षता, कुंकूचा टिळा लावा. आता फुलं, गुलाब आणि मिठाईचा प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवा.ही पूजा झाल्यानंतर लक्ष्मी देवीला दूध किंवा खीरचा प्रसाद नक्की दाखवा. त्यानंतर ही खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवा आणि नंतर त्याचं सेवन करा.
लक्ष्मी मंत्र
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः
कुबेर मंत्र
ऊं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन धान्याधिपतये
धन धान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा।।
चंद्रदेव मंत्र
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव सम्भवम ।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणं ।।
VIDEO तून जाणून घ्या पूजेची सोपी पद्धत
कोजागिरी पूजेचं महत्व (Kojagar Puja Importance)
पौराणिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेला समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा हा सण देवी लक्ष्मीजा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री जागरण करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने मानवाच्या जीवनातील सर्व संकट नाहीसे होतात. त्यासोबत सुख समृद्धी आणि धनाची प्राप्ती होते. त्यामुळे कोजागिरीची पूजा अतिशय शुभ मानली जाते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)