लग्न झालं, मधुचंद्रासाठी खोलीत गेले अन् दुसऱ्या दिवशी पलंगावर सापडले दोघांचे मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Married Couple Deadbody Found In Room: लग्न लागलं, धुमधडाक्यात वरात घरी आली, नवीन सुनेच्या गृहप्रवेशाने घरात आनंदी-आनंद होता. नवी नवरी (Bride) आणि नवरदेवाचे (Groom) सगळीकडे कौतुक होत होतं. नवरी पतीसोबत मधुचंद्र (Honeymoon) साजरा करण्यासाठी खोलीत गेली पण दुसऱ्या दिवशीच्या सकाळीच आली वाईट बातमी. कुटुंबीयांना खोलीतील पलंगावर दोघांचेही मृतदेह आढळले. लग्नाच्या ४८ तासांच्या आत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे. (Husband And Wife Dead)

४८ तासांत घडलं विपरीत

उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षांच्या प्रतापचे ३० मे रोजी २० वर्षांच्या पुष्पासोबत झालं होतं. दोघांच्या संमतीने हे लग्न झालं होतं. दोन्ही परिवार लग्नाच्या आनंदात होते. ४८ तासांपूर्वीच पुष्पाच्या आई-वडिलांनी तिची आनंदाने पाठवणी केली होती. मात्र, लग्नानंतर तिच्यासोबत असं काही घडेल याची त्यांनी तसूभरही कल्पना नव्हती. 

साहिलच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावे, आरोपीने पोलिसांसमोर थेट नावेच घेतली

सासरी धुमधडाक्यात झाले स्वागत

प्रतापच्या घरीही धूमधडाक्यात पुष्पाचे स्वागत झाले. नाचत गाजत वरात घरी आली होती. नातेवाईकही अद्याप लग्न घरातून गेले नव्हते. लग्नाच्या संध्याकाळी नवीन जोडपे सर्व विधी आणि जेवण वगैरे आटपून मधुचंद्रासाठी खोलीत गेले होते. मात्र, सकाळी उशीरापर्यंत खोलीचा दरवाजा उघडला नाही म्हणून कुटुंबीयांनी त्यांना आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. 

खोलीचे दार तोडताच समोर दिसले भयंकर दृश्य

कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीचे दारही वारंवार ठोठावून पाहिले. मात्र, आतून काहीच आवाज आला नाही. शेवटी प्रतापच्या लहान भावाने खिडकीतून खोलीत उडी घेतली. तर समोरचे दृश्य पाहून तो हादरलाच. पलंगावर पती-पत्नी दोघांचाही मृतदेह पडला होता. त्यानंतर नवरदेवाच्या भावाने आतून लावलेली कडी उघडली आणि मग नातावाईक खोलीत आले. त्यानंतर घरात एकच आक्रोश करण्यात आला. 

घरात सात दिवस पडून होता माय-लेकीचा मृतदेह, काय घडलं नेमकं? ‘ते’ CCTV फुटेज ठरणार पुरावा

कुटुबीयांच्या संमतीने झाले होते लग्न

घरातील इतर सदस्यांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेचच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच काय घडलं हे स्पष्ट हऊ शकेल. तसंच, त्यांचे लग्न दोघांच्या संमतीने झाले होते. कोणावरही दबाव नव्हता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. 

Related posts