नोकरीसाठी वणवण, रद्दीचा व्यवसाय अन् उभी केली 800 कोटींची संपत्ती; भारतीय उद्योजिकेचा परदेशात डंका

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Business News : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्या दिशेनंच वाटचाल करण्यासाठीची धडपड सुरु होते आणि मग ध्येय्यप्राप्तीसाठी प्रचंड मेहनत केली जाते. त्यात सातत्य राखलं जातं आणि एक दिवस याच सातत्यपूर्ण कामगिरीचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. अशाच जिद्द, चिकाटी आणि प्रचंड एकाग्रतेच्या बळावर मोठं झालेलं एक नाव म्हणजे भारतीय वंशाच्या उद्योजिका पूनम गुप्ता (Poonam Gupta Businesswoman). तुमचा विश्वास बसणार नाही, याच पूनम यांनी चक्क रद्दी खरेदी करत एकदोन नव्हे तब्बल 800 कोटींच्या किमतीचं साम्राज्य उभं केलं. 

कसा सुरु झाला प्रवास? 

महिला उद्योजिका पूनम गुप्ता या मुळच्या दिल्लीच्या असून, त्यांनी तिथंच एमबीएपर्यंच्या शिक्षणानंतर नोकरीचा शोध सुरु केला. पण, यात त्या अपयशी ठरल्या. पुढे स्कॉॉटलंडमध्ये नोकरीला असणाऱ्या पुनीत यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि लग्नानंतर त्या स्कॉटलंडला गेल्या. तिथंही त्यांनी नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, अनुभवाअभावी त्यांना अनेक अडचणी आल्या आणि इथंच त्यांना एक कल्पना सुचली. 

पूनम नोकरीच्या शोधात असतानाच त्यांना विविध कंपन्यांमध्ये रद्दीचे ढीग दिसले. त्यांनी यासंदर्भातील माहिती घेण्यास सुरुवात केली आणि या रद्दीचा पुनर्वापर करत नवं उत्पादन तयार करण्याच्या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. दरम्यान पूनम यांना स्कॉटलंडमधील एका योजनेअंतर्गत  1,00,000 रुपये इतकं अनुदान मिळालं आणि त्यांनी रद्दीचाच व्यवसाय सुरु केला. 

2003 मध्ये पूनम गुप्ता यांनी सरकारी अनुदानातून  PG Paper नावाची एक रद्दीचा पुनर्वापर करणारी संस्था सुरु केली. रद्दीतून मिळालेला कागद बाद करून त्यातूनच पुढे चांगल्या पद्धतीच्या कागदाची निर्मिती करण्याची त्यांची कल्पना चालली नाही, वेगानं धावली. पूनम यशाची शिखरं चढत गेल्या आणि त्यांची कंपनी आज 800 कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी ठरली आहे. 

फक्त स्कॉटलंडपुरता मर्यादित न राहता पूनम यांनी युरोप आणि अमेरिकेत व्यवसाय सुरु केला. आजच्या दिवसाला त्यांची ही कंपनी 60 देशांमध्ये कार्यरत आहे. अंदाज लावा त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती नेमकी किती झालिये….

Related posts