( प्रगत भारत । pragatbharat.com)
Petrol And Diesel Price in Maharashtra November 14, 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास डब्यू टीआय क्रूड 78.48 डॉलर्स प्रति बॅरलला उपलब्ध होतं. तर ब्रेंट क्रूड ऑइल 82.52 डॉलर प्रति बॅरलला पोहोचलं आहे. देशातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पहाटे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. भारतामध्ये रोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जारी केलं जातात. जून 2017 च्या आधी दर 15 दिवसांनी इंधनाच्या दरांमध्ये बदल केला जायचा.
5 राज्यांमध्ये इंधन महागलं
महाराष्ट्रामध्ये पेट्रोल 79 पैशांनी तर डिझेल 76 पैसे प्रति लिटरने महाग झालं आहे. बिहारमध्ये पेट्रोलचे दर 52 तर डिझेचे दर 48 पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. या शिवाय हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब आणि तामिळनाडूमध्येही पेट्रोल तसेच डिझेलचे दर वाढल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे गुजरामध्ये पेट्रोल 38 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 41 पैसे प्रति लिटरने स्वस्त झालं आहे. हरियाणामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण झाली आहे.
4 महानगरांमधील इंधनाचे दर
– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लीटरला आहे.
– मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटरला आहे.
– कोलकात्यामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटरला आहे.
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.65 रुपये आणि डिझेल 94.25 रुपये प्रति लीटरला आहे.
या शहरांमध्ये इंधनाचे दर किती?
– नोएडामध्ये पेट्रोल 96.92 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लीटर झालं आहे.
– गाजियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लीटर झालं आहे.
– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लीटर झालं आहे.
– पटनामध्ये पेट्रोल 107.54 रुपये आणि डिझेल 94.32 रुपये प्रति लीटर झालं आहे.
– पोर्ट ब्लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर झालं आहे.
रोज बदलते किंमत
रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डीजलची किंमत बदललते. रोज नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन, वॅट आणि इतर कर जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ भावापेक्षा जवळपास दुप्पट होते. याच कारणामुळे ग्राहकांना अधिक रक्कम मोजून भुर्दंड पडतो.
एसएमएसवर मिळेल माहिती
पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP आणि आपल्या शहराचा कोड टाइप करून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी आणि आपल्या शहराचा कोड लिहून एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तसेच HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.