Viral Video : धक्कादायक!…म्हणून तिने सर्वांसमोर चक्क नग्न अवस्थेत मंदिरात केला प्रवेश

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Girl Viral Video : सोशल  मीडियावर एका तरुणीच्या व्हिडीओने सगळ्यांना बुचकळ्यात पाडलं आहे. एका मंदिरात सोहळा सुरु असताना ती आली आणि तेही शरीरावर एकही कपडे न घालता. नग्न अवस्थेत तिने असंख्य लोकांसमोर मंदिरात प्रवेश केले. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. दुसरीकडे देशभरात मंदिरात भक्तांनी कसे कपडे परिधान करावे ही चर्चा रंगली असताना. हा व्हिडीओ थक्क करणारा आहे. 

महाराष्ट्रात तुळजाभवानी आणि अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरातील ट्रस्टने मंदिर परिसरात वेस्टर्न कपडे परिधान करण्यावर बंदी आणली आहे. त्यांनी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड नियम तयार केला आहे. त्यात मंदिरात तरुणीचं असं कृत्य प्रत्येकासाठी धक्कादायक आहे. नेमकं तिने असं काय केलं, ही घटना नेमकी कुठली आहे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. 

…म्हणून तिचं ‘हे’ कृत्य

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक स्थानिकांसोबत पर्यटक आले आहेत. अशातच एक तरुणी मंदिराच्या दिशेने येते आणि तेही एकही कपडे न घालता. तरुणीचं हे कृत्य पाहून उपस्थितांचे भुवया उंचवतात. ती निर्भयपणे मंदिराच्या दिशेने जाते दार उघडते आणि मंदिरात प्रवेश करते. 

मंदिरात आत जाऊन ती गुडघे टेकून प्रार्थना करताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता एका सुरक्षारक्षकासोबत तिचा वाद होताना दिसत आहे. येवढंच नाही तर ती मंदिरात नर्तकी नृत्य करत असतात त्यांचा शेजारी जाऊन बसते.  (naked Girl entered in temple front of everyone Bali video viral on Social media trending google now)

का केलं तिने असं ?

मिळालेल्या माहितीनुसार ती महिला मंदिरात प्रवेश करणार असताना तिला सुरक्षा रक्षकांनी अडवलं. त्यांचा सोबत धक्काबुक्की केली. म्हणून तिने या घटनेचा निषेध करण्यासाठी तिने कपडे काढून मंदिरात प्रवेश केला. 

कुठे घडली ही घटना?

ही घटना इंडोनेशियातील बालीमधील मंदिरात घडली आहे. दार्जा तुचिन्स्की असं त्या तरुणीचं नाव असून ती 28 वर्षांची आहे. प्रवेश नाकाराला म्हणून तिने धक्कादायक पाऊल उचलं. या घटनेनंतर मंदिर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. 

पोलिसांनी तिची मानसिक स्थिती तपासणीसाठी पाठवलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटवर Hans Solo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

 

Related posts