( प्रगत भारत । pragatbharat.com)
Astro Signs Related to Lizard : ज्योतिषशास्त्र, अंक शास्त्रानुसार अजून एक शास्त्र आहे शकुन शास्त्र. सजीवांच्या विविध कार्यांशी संबंधित या शास्त्रात अभ्यास केला जातो. त्या शास्त्रानुसार सजीवांच्या सूक्ष्म क्रियांच्या आधारे आपल्याला भविष्यातील शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत मिळत असतात. शकुन शास्त्रामध्ये चांगल्या-वाईटाची लक्षणं सांगण्यात आली आहे. आजही शतकानुशतके काही कृती आणि घटना या शुभ आणि अशुभ मानल्या जात आहेत. म्हणूनच त्यांना शकुन-अपशकुन म्हणतात. (Astrology news in marathi)
घराच्या खिडकीत कावळा ओरडायला लागला की आजही म्हणतात, म्हणजे पाहुणे येणार आहे. ही झाली कावळ्याची गोष्टी पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की घरात दिसणारी पालदेखील त्याला भविष्याचे संकेत देत असते. पाल हा शब्द घेतला तरीच आपल्याला किळस वाटतो आणि खूप जास्त भीती. पुरुष असो किंवा स्त्री त्यांची पाल दिसली की ततफफ होते. घरात नको नको असणारी पाल तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते, झालात ना अवाक्…चला मग शास्त्रानुसार पाली संबंधित शुभ आणि अशुभ संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. (lizard these signs bring wealth and blessings lakshmi Astrology news in marathi )
पाल संदर्भातील अशुभ संकेत
या ठिकाणी मेलेली पाल दिसल्यास…
नवीन घरात किंवा दुकानात तुम्हाला मेलेली पाल दिसल्यास ते शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार या संकेतचा अर्थ भविष्यात कुटुंबातील सदस्याची प्रकृती खराब होऊ शकते.
जमिनीवर पाल चालताना दिसली तर
पाल जमिनीवर चालताना दिसली तर ते अशुभ संकेत असतात. घरात किंवा दुकानात असं दिसल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
पाल स्वप्नात दिसली तर…
तुम्हाला स्वप्नात एखादी पाल दिसली तर ते अशुभ मानलं जातं. शास्त्रानुसार भविष्यात तुम्हाला आरोग्याची समस्या आणि आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
दोन पालींना लढताना दिसल्यास
घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसल्या हे अशुभ मानलं जातं. शास्त्रानुसार भविष्यात तुमचं जोडीदाराशी वाद होण्याचे संकेत आहेत.
पाल डाव्या पायावर पडली तर…
डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली याचा अर्थ घरावर संकट कोसळणार आहे.
पाल संदर्भात शुभ संकेत
पाल उजव्या पायावर पडली तर…
पालीची भिंतीवर पकड मजबूत असते तरीदेखील जर ती तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर ते शुभ संकेत असते. शास्त्रानुसार तुम्ही प्रवासाचे योग आहे आणि आर्थिक फायदा होणार आहे.
घराच्या मंदिरात पाल असेल तर
शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे.
तुळशीजवळ पाल दिसली तर
तुळशीच्या रोपाभोवती पाल दिसल्यास अमाप संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत.
भिंतीवर चढताना पाल दिसली तर
तुम्हाला पाल भिंतीच्या वरच्या बाजूला चढताना दिसली म्हणजे प्रगती आणि लाभाचे संकेत आहे.
सकाळी उठल्यावर पाल दिसली तर..
शकुन शास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला पहिल्यांदा पाल दिसली तुम्हाला भविष्यात शुभलाभ होणार आहे.