उड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या मोतिहारी रस्त्यांवर शुक्रवारी एक विचित्र घटना घडली. एका मोठ्या उड्डाणपुलाच्या खाली भलेमोठे विमान फसले. उड्डाणपुलाच्या खाली विमान फसल्याने परिसरातून एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या पुलाच्या खाली विमान आलेच कसे? तर विमानतळाच्या जवळ उड्डाणपुल कसा आला यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण नेमकं काय प्रकरण आहे? हे जाणून घेऊया. 

बिहार येथील मोतिहारी रस्त्यांवर ही घटना घडली आहे. उड्डाणपुलाच्या मध्येच विमान अडकल्यामुळं मोठी वाहतूक कोंडीदेखील झाली होती. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. खरंतर हे विमान तुटलेले होते. एका मोठ्या ट्रेलरवरुन ते मुंबईहून आसामला नेण्यात येत होते. मात्र, रस्तेमार्गाने बिहार येथे येताच पीपराकोठी परिसरात एका उड्डाणपुलाच्यामध्येच अडकून पडले. यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली. तसंच, या प्रसंगाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळं हे विमान कसे काढण्यात आले याबाबत उत्सुकता निर्माण होत होती. 

उड्डाणपुलाच्या खाली अडकलेले विमान हे लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता. हे विमान पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील जमा होऊ लागली होती. लोक त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करत होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दिसत आहे की, वाहतुक कोंडीत अडकलेले प्रवासी मार्ग काढताना दिसत आहेत. कारण विमानाने पूर्ण रस्ता अडवला होता. 

व्हिडिओत दिसत आहे की, एनएच 27 महामार्गावर वाहनांची भलीमोठी रांग लागलेली दिसत आहे, ज्यामध्ये पिप्रकोठी पुलाखाली फसलेला ट्रेलर ट्रकमधून विमान बाहेर पडताना दिसत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाला पुलाच्या उंचीचा अंदाज आला नाही. पुलाखालून सहज विमान जाऊ शकेल असा तर्क त्याने लावला आणि त्याने ट्रेलर पुढे नेला मात्र, त्याचा अंदाज चुकला आणि विमान पुलाखाली अडकले. जवळपास दोन तास हे विमान असेच अडकून पडले होते. 

दोन तासांना अथक प्रयत्नांनंतर हे विमान काढण्यात यश आहे. त्यानंतर वाहतुककोंडीत अडकलेल्या नागरिकांनी निश्वास सोडला. 

विमान कसे बाहरे काढले?

पिपराकोठीचे पोलीस अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान अडकून पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ज्या ट्रकवरुन विमान नेण्यात येत होते त्या ट्रकच्या सर्व चाकांतील हवा काढण्यात आली त्यानंतर अडकलेले विमान बाहेर काढण्यात यश आले आणि वाहतूककोंडीतून सुटका झाली.

Related posts