MS Dhoni Video Amid Maldives And Explore India Tourism in Between India Maldives Row; भारत-मालदीव वादात का व्हायरल होतोय धोनीचा व्हिडीओ?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

M S Dhoni Video On India Tourism : गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांच्या काही टिप्पण्यांवरून सुरू असलेला वाद थांबत नाही. या प्रकरणी भारत सरकारने मालदीवच्या राजनैतिक अधिकाऱ्याला समन्स बजावले असताना, सोशल मीडियावर प्रत्येक भारतीय याविषयी संताप व्यक्त करत आहे. यात क्रिकेटपटूही मागे राहिले नाहीत. वीरेंद्र सेहवागपासून इरफान पठाणपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी भारत आणि पंतप्रधान मोदींच्या या अपमानाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. या सगळ्यामध्ये एमएस धोनीचा एक जुना व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ या वादात अगदी तंतोतंत बसतो.

सोशल मीडियावरील भारतीय युजर्स मालदीवच्या मंत्र्यांच्या पीएम मोदींबद्दलच्या कमेंटला लज्जास्पद म्हणत आहेत. युझर्सनी भारतीयांना मालदीवऐवजी भारतात पर्यटनासाठी विविध सुंदर ठिकाणे निवडण्याचे आवाहन केले आहे. भारतातील अनेक बड्या व्यक्ती मालदीवऐवजी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा सल्ला देत आहेत. याच अनुशंगाने एम एस धोनीचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी म्हणत आहे की, आता त्याला प्रथम संपूर्ण भारत प्रवास करायचा आहे.

धोनी नेमक काय म्हणतोय?

या व्हिडिओमध्ये धोनी म्हणतोय, मी खूप प्रवास केला पण सुट्टीच्या उद्देशाने नाही. माझ्या क्रिकेट खेळण्याच्या दिवसात मी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या पण माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असल्यामुळे मी फारसे पाहिले नाही. माझ्या पत्नीला प्रवास करायला आवडतो. त्यामुळे आता माझा प्लॅन असा आहे की, आम्हाला वेळ मिळेल तसा प्रवास करायचा आहे. सर्वात आधी आम्हाला भारत पाहून आमचा प्रवास सुरू करायचा आहे. आपल्या भारतात अनेक सुंदर ठिकाणे आहेत. त्यामुळे इतर कुठेही जाण्यापूर्वी मला हे बघायला आवडेल.

धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना भारतीय यूझर्स लिहित आहेत की, मालदीवऐवजी आधी भारतातील पर्यटनस्थळांना भेट द्या. धोनीही तेच म्हणतोय.

काय आहे वाद?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 जानेवारी रोजी लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर लोक म्हणू लागले की, आता भारतीयांनी मालदीवला नव्हे तर लक्षद्वीपला जावे. सोशल मीडियावर हा विषय चर्चेत होता. दरम्यान, मालदीवमधील मुइज्जू सरकारमधील मंत्री मरियम शिउना यांनी काही आक्षेपार्ह ट्विट केले होते. येथे त्यांनी पीएम मोदींची खिल्लीही उडवली. याशिवाय ती लक्षद्वीपची खिल्ली उडवतानाही दिसली. त्यांच्यानंतर मालदीवचे नेते मलशा शरीफ आणि महजूम मजीद यांनीही काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे मालदीवबद्दल भारतात संताप व्यक्त होत आहे.

Related posts