नवविवाहिता तिच्या रुममध्ये प्रियकराबरोबर सापडली! पतीने रंगेहाथ पकडताच केली अजब मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील संबळमधील नखासा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये एका विवाहित महिलेला भेटण्यासाठी तिला प्रियकर पोहोचला. या महिलेच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. या दोघांना पतीने बेदम मारहाण केली. तसेच 112 क्रमांकावर फोन करुन या व्यक्तीने पत्नीचा प्रियकर तिला भेटायला आला होता अशी माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. पोलीस या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. या महिलेचा पतीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर या महिलेने एक विचित्र मागणी केली. या महिलेची मागणी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. या महिलेने मला माझ्या प्रियकराबरोबर राहायचं आहे, अशी मागणी या महिलेने केली.

Related posts