5 Vegetarian Super Foods For High Protein Better Than Eggs; प्रोटीनसाठी केवळ अंडीच नाहीत तर ५ शाकाहारी पदार्थ ठरतील वरदान, ताकदीने भरेल शरीर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सफेद चणे

सफेद चणे

सफेद चणे अथवा ज्यांना काबुली चणे म्हटलं जातं, यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असते. छोले भटुरे म्हटल्यानंतर अगदी चित्र स्पष्ट होईल. प्रोटीन डाएटमध्ये तुम्ही काबुली चण्यांचा समावेश करून घेतल्यास नक्कीच फायदा मिळेल. १०० ग्रॅम उकडलेल्या काबुली चण्यामध्ये १९ ग्रॅम प्रोटीनचा समावेश असतो तर १ कप काबुली चण्यामध्ये ७.७ ग्रॅम प्रोटीन असते. काबुली चण्याची भाजी, Hummus, सूप अथवा सँडविच बनवून खाल्ल्यास प्रोटीन मिळू शकते.

सोयाबीन

सोयाबीन

प्रोटीनने भरपूर युक्त अशा शाकाहारी जेवणामध्ये सोयाबीनचे नाव हमखास येते. सोयाबीन Vegan Diet साठीही भरपूर प्रमाणात वापरले जाते. हे प्लांट बेस्ड प्रोटीन असून सर्वात चांगला स्रोत आहे. १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ३६ ग्रॅम प्रोटीन आढळते. ज्या व्यक्ती शाकाहारी असून अंडे खात नाहीत त्यांनी नक्कीच सोयाबीनचा वापर करून घ्यावा. अभ्यासानुसार सोयाबीनला संपूर्ण प्रोटीन फूड असं म्हटलं जातं.

चिया सीड्स

चिया सीड्स

चिया सीड्समध्येही चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळतं. १०० ग्रॅम चिया सीड्समध्ये साधारणतः १७ ग्रॅमच्या आसपास प्रोटीन आढळते. या दाण्याच प्रोटीनसह अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा – ३ फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात.

डाळींचा करा समावेश

डाळींचा करा समावेश

लाल, ब्राऊन, हिरव्या सर्व डाळींचा जेवणात समावेश करून घेतल्यास प्रोटीनचा उत्तम स्रोत मिळू शकतो. डाळी एकत्र करून अथवा वेगवेगळ्या शिजवूनही तुम्ही डाएटचा भाग करून घेऊ शकता. टाकोज, सूप, आमटी, डाळीचं सलाड, पराठ्यामध्ये डाळींचा वापर करून तुम्ही योग्य प्रोटीनचा समावेश आहारात करून घेऊ शकता. एक वाटी डाळीमध्ये साधारण १२ ग्रॅम प्रोटीन शरीराला प्राप्त होते.

सुका मेवा

सुका मेवा

अनेक सुका मेवा आहारात समाविष्ट करून घेणे उत्तम ठरते. प्रोटीनने युक्त असणारा शेंगदाणाही अत्यंत फायदेशीर ठरतो. एक कप शेंगदाण्यामध्ये ९ ग्रॅम प्रोटीन मिळते. तसंच बदाम आणि पिस्ताही प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. एक कप बदाममध्ये ७ ग्रॅम, पिस्त्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटीन असते. तसंच ओट्स आणि दलियाही चांगला स्रोत आहे.

[ad_2]

Related posts