पीएनबी बॅंकेत हजारो पदांची भरती, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PNB Specialist Officer Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेत ऑफिसर क्रेडीची 1 हजार पदे, व्यवस्थापक (विदेशी मुद्रा) ची 15 पदे, व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) ची 5 पदे आणि वरिष्ठ व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) ची 5 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.  यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

परीक्षा आणि मुलाखत 

पीएनबी स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लेखी परीक्षा आणि त्यानंतर थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक रिक्त पदांसाठी आलेल्या अर्जाची संख्या पाहून मुलाखतींबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे. लेखी परीक्षा 100 मार्कांची असेल आणि यासाठी 2 तासांचा वेळ असेल. वैयक्तिक मुलाखत ही 50 गुणांची असेल. 

तरुणांनो, तयारीला लागा! आयकर विभागात 12 हजार पदांची भरती

अर्ज शुल्क 

एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी वर्गातील उमेदवारांना 50 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी म्हणजेच 59 रुपये अर्ज शुल्क भरावे. इतर वर्गातील उमेदवारांना 1 हजार रुपये अधिक 18 टक्के जीएसटी असे 1,180 रुपये शुल्क भरावे लागेल. 

युनियन बँकेत शेकडो पदांची भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बॅंकींग, आयएमपीएस, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट किंवा यूपीआयच्या माध्यमातून अर्ज शुल्क भरता येणार आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याची अर्ज प्रक्रिया 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 25 फेब्रुवारी 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. 

उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, चुकीची माहिती आढळल्यास, दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद केला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी 

Related posts