MIL Job Munitions lndia Limited DBW Post Vacancy Pune Marathi News; म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती, काय आहे पात्रता? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MIL Job: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुण्यात  म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती सुरु असून येथे तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत  DBW पदांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. असे असले तरी ही नोकरी विशिष्ट कालावधीसाठी असणार असेल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. अटेंडंट ऑपरेटक केमिकल प्लांटमध्येही भरती केली जाईल. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड आणि  म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत ट्रेनिंग घेतलेल्या आणि कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. 1 वर्षाच्या कालावधीसाठी ही नोकरी असून याचा कालावधी 4 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. 

एकूण 82 पदे भरताना मागासवर्गीय उमेदवारांना भरतीमध्ये सवलत दिली जाणार आहे. त्यांच्यासाठी काही जागा राखीव असतील. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 35 वर्षांच्या आत असावे. 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एससी/एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे, माजी सैनिकांना मिलिटरी सर्व्हिसनंतर 3 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. 

उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 900 अधिक डियरनन्स अलाऊन्स दिला जाईल. उमेदवारांनी आपले अर्ज ॲडमिन बिल्डिंग, ऑर्डनन्स फॅक्टरी बडमाळ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 

30 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

युनियन बँकेत शेकडो पदांची भरती

बॅंक भरती परीक्षांची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट. युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. येथे मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापकासह विविध पदे भरली जाणार आहेत. एकूण 606 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन, स्क्रीनिंग किंवा मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 23 फेब्रुवारी ही अर्जाची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट वर जा. होमपेजवर तुम्हाला रिक्रूटमेंट सेक्शन अंतर्गत ‘Union Bank Recruitment Project 2024-25 (Specialist Officers)’ लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. 

Related posts