इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला|Iran Pakistan tensions Pakistan Confirms Death Of 9 Citizens In Attack By Unknown Gunmen Inside Iran

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tension in Iran Pakistan: इराण आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे.पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी काहि दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या घटनेनंतर चारच दिवसांत अग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणमधील पाकिस्तानी दुतावासांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात बदुंकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. या तिघांचा शोध सुरू असून गोळीबाराच्या…

Read More

इराणमध्ये हिजाब न घालणाऱ्या महिलांविरोधात कारवाई, लाथ मारुन गाडीत बसवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Hijab: इराणमध्ये (Iran) पुन्हा एकदा महिलांना हिजाबची (Hijab) सक्ती केली जात आहे. जवळपास 10 महिन्यांनी पुन्हा एकदा इराणच्या रस्त्यांवर मोरॅलिटी पोलीस (Morality Police) उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाबला विरोध दर्शवत आंदोलन केलं जात असताना महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर मोरॅलिटी पोलिसांना हटवण्यात आलं होतं. हा विभाग बरखास्त करण्यात आल्याचंही बोललं जात होतं.  दरम्यान, रविवारी जनरल सईद मुंतजिर उल महदी यांनी सांगितलं की, मोरॅलिटी पोलीस विना हिजाब महिलांची धरपकड करत आहेत. महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानतर इराणमध्ये आंदोलन पेटलं होतं. मात्र हे आंदोलन नंतर…

Read More