व्हिडीओ कॉलवर महिला एजंट विवस्त्र होताच ‘तो’ गोपनीय माहिती देई; पाकला भारतीय लष्कराची माहिती देणाऱ्याला ‘हेर’लं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PAK Spy arrested in Rajasthan: भारतीय लष्कराच्या (Indian Army) कोणत्या तुकड्या सीमाभागात तैनात असणार इथपासून लष्करामधील महत्त्वाच्या बैठका आणि तत्सम माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या हेराला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. हेरगिरी आणि भारतीय लष्करासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणाऱ्या महिला एजंटना देण्याच्या आरोपांअतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातून या प्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. 

पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींवर पाकमधील गुप्तचर यंत्रणा नियंत्रण ठेवून असते. ज्यासाठी हेरांच्या मदतीनं मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा नेमकी कुठं तैनात करायची यासारखे निर्णयघेण्यात येतात. ही सर्व माहिती श्री गंगानगर जिल्ह्यातील सुरतगड आर्मी कँटमधून ताब्यात घेण्यात आलेल्या आनंदराज नावाच्या तरुणानं चौकशीदरम्यान उघड केली. 

व्हिडीओ कॉलवर त्या विवस्त्र होत आणि… 

ADGP च्या माहितीनुसार आरोपी सूरतग सेना छावणीबाहेर गणवेशाचं दुकान चालवत होता. काही यदिवसांपूर्वी त्यानं हे दुकान बंद करत बहरोड़ भागातील एका कारखान्यात काम सुरु केलं. तो पाकिस्तानमधील तीन महिला एजंटच्या संपर्कात होता. गेल्या दोन वर्षांपासून तो या महिलांना भारतीय लष्कर, युद्ध क्षेत्र आणि तत्सम गोष्टींसंदर्भातील व्हिडीओ आणि फोटोंसह महत्त्वाची माहिती पुरवत होता. इतकंच नव्हे, तर त्यानं कँट परिसरातील वाहन दुरुस्ती करणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकही त्यांना दिले होते. व्हिडीओ कॉलदरम्यान या महिला एजंट विवस्त्र होत असंत आणि आरोपी त्यांना ही माहिती देई. तो या महिलांचे व्हिडीओही रेकॉर्ड करत असेल. ही बाब त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या अश्लील व्हिडीओ आणि फोटोंवरून लक्षात आली. आरोपीनं या महिलांकडे माहितीच्या मोबदल्यात पैशांचीही मागणी केल्याची बाब तपासातून समोर आली. 

पाकिस्तानी एजंटच्या सापळ्यात सापडला आनंदराज 

आनंदराज संपर्कात असणाऱ्या तीनपैकी रेश्मानं (नाव बदलण्यात आलं आहे) जयपूर सैन्य रुग्णालयात अधिकारी असल्याचं सांगत आनंदराजशी संपर्क साधला. लग्नाचं आमिष दाखवत त्याला जयपूरला बोलवून नंतर माघारी पाठवलं. रेश्मानंच रेहा (नाव बदललं आहे) सोबत आनंदराजची ओळख करून देत ती विद्यार्थीनी असल्याचं खोटं सांगितलं होतं. तर, सलोनीनं (नाव बदललं आहे) बिकानेर आर्मी परिसरातील उपहारगृहा चालवणाऱ्या विक्रम सिंहला जाळ्यात अडकवलं बहोतं. हीच सलोनी  हिमानी या नावानं आनंदराजच्याही संपर्कात होती. आनंदराज या तीन  पाकिस्तानी महिला एजंच्या संपर्कात असून त्यांच्याशी तो अश्लील संवाद साधत असे. यामोबदल्यात तो संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होता. भारतीय लष्करासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती आनंदराजकडून पाकपर्यंत पोहोचल्याची भीती सध्या व्यक्त केली जात असून, आता उच्चस्तरिय अधिकारीसुद्धा या प्रकरणात लक्ष घालताना दिसत आहेत. 

Related posts