“आजी नाही, ही तर माझी बायको….,” 8 वर्षाच्या चिमुरड्याचा पुनर्जन्म झाल्याचा दावा, म्हणतो “आईने तर माझ्या…”

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. येथील 8 वर्षांच्या एका मुलाने आजी आपली पत्नी असून, आई मुलगी असल्याचा दावा केला आहे. ही आजी नसून, आपली पत्नी आहे असं त्याचं म्हणणं आहे. सुरुवातीला कुटुंबाने तो मस्करी करत असल्याचं समजत दुर्लक्ष केलं. कुटुंबाने ही गोष्ट गांभीर्याने घेतलं नाही. पण नंतर त्याने काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्या गोष्टी त्याच्या जन्माच्या आधी घडल्या होत्या.

एलाउ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विचित्र घटना घडली आहे. 15 जूनला 8 वर्षांचा आर्यन दुबे आपल्या आईसह ननिहाल रतनपूर येथे आला होता. यावेळी आईने त्याला आजीच्या पाया पडायला सांगितलं असता त्याने नकार दिला. ही आजी नाही तर माझी पत्नी आहे आणि मामा माझा मुलगा आहे असं तो म्हणू लागला. 

कुटुंबाने सुरुवातीला आर्यनचं हे बोलणं गांभीर्याने घेतलं नाही. पण मुलगा आपल्या बोलण्यावर ठाम होता. यानंतर त्याने सर्व घटना सांगण्यास सुरुवात केली, ज्या त्याच्या जन्माच्या आधी घडल्या होत्या. आर्यनने सांगितलं की, त्याचं नाव मनोज मिश्रा आहे. 8 वर्षांपूर्वी 9 जानेवारी 2015 मध्ये जेव्हा तो शेतात काम करत होता तेव्हा त्याला एक छिद्र दिसलं. शेतातील सगळं पाणी त्या छिद्रात जात होतं. पायाच्या आधारे मी ते छिद्र बंद करण्याचा प्रयत्न केला असता साप चावला. यानंतर तो बेशुद्ध पडला आणि रुग्णालयात नेलं जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला. 

मुलाचं हे बोलणं ऐकून कुटुंबाला धक्काच बसला. कारण ही घटना घडली होती आणि मनोज मिश्रा हे त्याच्या आजोबांचं नाव आहे. 

आर्यन दुबे इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने सांगितलं की, जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मुलगी रंजना (आर्यनची आई) गर्भवती होती. माझ्या मृत्यूनंतर तेराव्याला तिने मुलाला जन्म दिला. इतक्या लहान मुलाला हे सगळं माहिती असणं कठीण आहे. त्यामुळे हा पुनर्जन्म असावा असे दावे केले जात आहेत. आर्यन मामा आपली मुलं आणि आईला मुलगी असल्याचं सांगत आहे. 

आर्यनचा मामा अजयने सांगितलं की, जेव्हा तो 4 वर्षांचा होता तेव्हापासून तो आईला आपली मुलगी सांगत आहे. पण आम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही. पण आता त्याने जे सांगितलं आहे ते ऐकून सगळे हैराण झाले आहेत. इतकंच नाही तर आर्यनने मनोज मिश्रा यांच्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या फक्त त्याच्या आजीला माहिती होत्या.

Related posts