Vitamin D Deficiency Causes Joint Pain And Stiffness In Bones; या कारणाने सुकते हाडांमधील पाणी, शरीरात विटामिनची कमतरता ठरतेय सांध्यातील त्रासासाठी जबाबदार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

विटामिन डी कमतरतेमुळे सांधेदुखी

विटामिन डी कमतरतेमुळे सांधेदुखी

विटामिन डी कमतरतेमुळे Osteocalcin आणि Osteoporosis सारखे आजार होतात. वास्तविक जेव्हा शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरतेमुळे हाडे आतून कमजोर होऊ लागतात आणि हाडांची बळकटी कमी होऊ लागते. यादरम्यान हाडांदरम्यान घर्षण वाढत आणि हाडं आखडतात.

हाडांमधील त्रास

हाडांमधील त्रास

हाडांमधील त्रास विटामिन डी च्या कमतरतेमुळे उठता बसतानाही प्रचंड त्रास होतो. तसंच सांधेदुखी वाढून हिवाळ्यात हाडं अधिक आखडली जातात. हाडांवर याचा सर्वात जास्त परिणाम होताना दिसून येतो.

(वाचा – महिन्यातून किती वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेणे ठरते महिलांसाठी योग्य, दुष्परिणाम घ्या लक्षात)

हाडांसाठी विटामिन डी ची आवश्यकता का

हाडांसाठी विटामिन डी ची आवश्यकता का

विटामिन डी हे कॅल्शियमच्या पोषणासाठी अत्यंत गरजेचे असून हाडांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सेकोस्टेरॉईड हार्मोनशी संबंधित आहे. विटामिन डी च्या कमतरतेमुळे मुलांमध्ये रिकेट्स आणि वृद्धांमध्ये ऑस्टियोमलेशिया आजार होतात.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर शरीरातील विटामिन डी ची कमतरता म्हणजे कॅल्शियमची कमतरता आणि हाडांचे कमजोर होणे. कॅल्शियमसाठी विटामिन डी युक्त भरपूर पदार्थ खाऊ शकता.

(वाचा – Vitamin B12 साठी केवळ मांस-मच्छीची गरज नाही, ५ शाकाहारी पदार्थांमधून मिळेल तगडे विटामिन)

विटामिन डी युक्त पदार्थ

विटामिन डी युक्त पदार्थ

विटामिन डी ने युक्त असणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि NCBI च्या अहवालानुसार, मशरूम, मच्छी, अंडा आणि टुनामध्ये अधिक प्रमाणात विटामिन डी अधिक प्रमाणात असतात. याशिवाय दूध पिऊन विटामिन डी ची कमतरता तुम्ही पूर्ण करू शकता.

(वाचा – सुपरफूड मिलेट्सचे फायदे, बाळापासून वयस्करांपर्यंत ठरतंय आहारातील महत्त्वाचे पोषण)

[ad_2]

Related posts